Solapur News : ‘केसीआर’चा विश्वासू नेता सोलापुरात दाखल : आणखी कोण लागणार गळाला?; काँग्रेस-राष्ट्रवादीलाच धास्ती

बीआरएसची खरी भिती ही महाविकास आघाडीतील पक्षालाच आहे.
K. Chandrashekhar Rao-Dharmanna Sadul
K. Chandrashekhar Rao-Dharmanna SadulSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : तेलंगणाचे भारत राष्ट्र समितीचे आमदार आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांचे विश्वासू एन. रामलू हे सोमवारपासून सोलापूर (Solapur) शहरात तळ ठोकून आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी खासदार धर्माण्णा सादूल हे भारत राष्ट्र समितीमध्ये दाखल झाले आहेत. सादूल यांच्या मदतीने राव यांचे निकटवर्तीय आमदार आणखी किती जणांना गळाला लावतात, हे पाहणे महत्वाचे आहे. (Bharat Rashtra Samiti's MLA N. Ramlu entered Solapur)

दरम्यान, चंद्रशेख राव यांच्या पक्षाने आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते फोडले आहेत. सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचा एकही नेता बीआरएसच्या गळालेला लागलेला नाही. त्यामुळे बीआरएसची खरी भिती ही महाविकास आघाडीतील पक्षालाच आहे. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीलाच मोठी धास्ती आहे.

K. Chandrashekhar Rao-Dharmanna Sadul
K Chandrashekar Rao : चंद्रशेखर राव काँग्रेसला देणार मोठा धक्का; दोन आमदार 'बीआरएस'मध्ये करणार प्रवेश?

बीआरसीच्या सोलापुरातील पक्षवाढीच्या कार्याची पायाभरणीसाठी सातत्याने पक्षाचे पदाधिकारी माजी खासदार धर्माण्णा सादूल यांच्याशी संपर्कात आहेत. मागील आठवड्यात सादूल यांनी त्यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा केल्यानंतर पक्षाकडून पुढील तयारीबाबत उत्सुकता लागली होती. सादूल यांनी बीआरसीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्याशी संवाद साधून पुढील कार्यक्रमाबाबत चर्चा केली होती.

K. Chandrashekhar Rao-Dharmanna Sadul
Mp Pratap Patil Chikhlikar News : बाजार समिती निवडणुकीच्या तोंडावरच चिखलीकरांचा चव्हाणांना धक्का..

त्या चर्चेनंतर एन. रामलू हे सोलापुरात दाखल झाले आहेत. तुळजाभवानीचे दर्शन घेऊन त्यांनी दौऱ्याची सुरवात केली आहे. माजी खासदार धर्माण्णा सादूल, गणेश पेनगोंडा यांच्या उपस्थितीत सोमवारपासून (ता. १० एप्रिल) आ. रामलू यांनी शहरातील नागरिकांशी संवाद सुरु केला. तेलगु भाषिकांसोबत अनेक आजी-माजी नगरसेवक, ज्ञाती संघटनांचे पदाधिकारी व प्रतिष्ठीत नागरिकांनी रामलू यांची भेट घेऊन चर्चा केली.

शासनाच्या योजना, प्रत्यक्षात नागरिकांच्या अडचणी, भाषिक समस्या, विकासाचे प्रश्न या अनुषंगाने या नागरिकांनी रामलू यांच्याशी चर्चा केली. मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या समस्यांच्या संदर्भात मांडणी केली.

K. Chandrashekhar Rao-Dharmanna Sadul
Karnataka Assembly Election : ‘बंडखोरी करू नका; महामंडळाचे अध्यक्षपद देऊ...’ : संभाव्य बंडखोरांना काँग्रेसची ऑफर

सोमवारी दिवसभर चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर आ. रामलू हे आज (ता. ११ एप्रिल) पुन्हा अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते हैदराबाद येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना दौऱ्याचा अहवाल सादर करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com