Congress Young Brigade : काँग्रेसने ‘यंग ब्रिगेड’ उतरवली मैदानात; शिंदे, कदम, देशमुख, पाटलांवर विशेष जबाबदारी

Loksabha Election : पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार काँग्रेसने महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे काम सुरू केले आहे.
Praniti Shinde-Kunal Patil-Satej Patil-Vishwajit Kadam-Amit Deshmukh
Praniti Shinde-Kunal Patil-Satej Patil-Vishwajit Kadam-Amit DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Solapur : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून रणनीती आखण्यास सुरुवात करण्यात आली आहे. देशपातळीवर भाजपविरोधात सर्वपक्षीय आघाडी उभारण्याचा प्रयत्न होत असताना काँग्रेसकडून ‘यंग ब्रिगेड’वर लोकसभेच्या विशेष मोहिमेची जबाबदारी सोपवली आहे. शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ असणारे मतदारसंघ या तरुण नेत्यांकडे देण्यात आले आहेत. (Congress gave special responsibility to Satej Patil, Praniti Shinde, Vishwajit Kadam, Amit Deshmukh)

पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार काँग्रेसने महाराष्ट्रात (Maharashtra) लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) काम सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व ४८ मतदारसंघात पक्षनिरीक्षक आणि त्यांना मदतनीस देण्यात आले आहेत. काँग्रेस हा महाविकास आघाडीत सर्वांत मोठा पक्ष आहे. मात्र, सर्वच लोकसभा मतदारसंघ निरीक्षक नेमल्याने महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र निवडणूक लढविणार की स्वतंत्रपणे याची चर्चा काँग्रेसने (Congress) नेमलेल्या निरीक्षकांनंतर रंगली आहे.

Praniti Shinde-Kunal Patil-Satej Patil-Vishwajit Kadam-Amit Deshmukh
Sumantai Patil Letter To Munde : सुमनताई पाटील यांच्या पत्रावर कृषिमंत्री धनंजय मुंडेंचे सचिवांना तातडीने आदेश

दरम्यान, काँग्रेस हायकमांडने आपल्या मित्रपक्षाच्या मतदारसंघातही निरीक्षक नेमले आहेत. त्यात रायगड, बारामती, शिरूर या राष्ट्रवादीच्या, तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग, धाराशिव या शिवसेनेच्या (उबाठा) मतदारसंघांचाही समावेश आहे. आमदार आणि मंत्री म्हणून काम केलेल्या युवा नेत्यांवर पक्षाने लोकसभा निवडणुका जिंकण्याची जबाबदारी टाकलेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी धुळ्याचे आमदार कुणाल पाटील यांच्याकडे दिली आहे, तर मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांना दिलेली आहे.

Praniti Shinde-Kunal Patil-Satej Patil-Vishwajit Kadam-Amit Deshmukh
Vidharbh Politic's : दिल्लीश्वरांचा पटोलेंना दुसरा धक्का; विजय वडेट्टीवार नानांना पुन्हा ठरले भारी!

माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांच्याकडे शिवसेना या मित्रपक्षाचे खासदार असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि सुनील तटकरे खासदार म्हणून निवडून आलेल्या रायगडची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. विश्वजित कदम यांना कपिल पाटील यांच्या माध्यमातून जिंकलेली भिवंडी, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे निवडून आलेल्या कल्याणची जबाबदारी दिलेले आहे.

Praniti Shinde-Kunal Patil-Satej Patil-Vishwajit Kadam-Amit Deshmukh
Ajit Pawar News : भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला?; अजितदादांनी अमित शहांसमोरच सगळं सांगून टाकलं...

मराठवाड्याचे युवा नेते, माजी मंत्री अमित देशमुख यांच्याकडे भाजपचा खासदार असलेला बीड आणि शिवसेनेचे खासदार असलेला धाराशिव जिंकण्याची मोहिम देण्यात आली आहे. यातील अनेक मतदारसंघ हे मित्रपक्षाकडे आहेत, त्यामुळे निवडणूक स्वबळावर लढणार की आघाडी करून याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com