Balasaheb Thorat On District Division : अहमदनगर जिल्हा विभाजनावर बाळासाहेब थोरात यांचे मोठे वक्तव्य..

Balasaheb Thorat On Ahmednagar District Division : एक नवीन जिल्हा निर्माण करण्यासाठी जवळपास 56 वेगवेगळ्या प्रकारचे कार्यालय उभे करावे लागतात.
Balasaheb Thorat On Ahmednagar District Division :
Balasaheb Thorat On Ahmednagar District Division : Sarkarnama

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : भौगोलिक क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन केले जावे, अशी फार जुनी मागणी आहे. मात्र उत्तर नगर जिल्ह्याचे मुख्यालय श्रीरामपूर, शिर्डी की संगमनेर हा कळीचा मुद्दा राहिलेला आहे.

या तीनही ठिकाणच्या नागरिकांनी आपल्याच शहरांमध्ये जिल्हा मुख्यालय व्हावं, यासाठी आग्रही मागणी करत आंदोलने केलेली आहेत. तसेच तेथील स्थानिक नेत्यांचा आंदोलकांना पाठिंबाही मिळाला आहे. मात्र एकूणच मागणी जुनी असली तरी अद्याप पर्यंत जिल्हा विभाजनाला सरकारने मंजुरी दिलेली नाही वा तशी साधी घोषणाही केलेली नाही. (Balasaheb Thorat On Ahmednagar District Division)

Balasaheb Thorat On Ahmednagar District Division :
Bhagirath Bhalke Join BRS : मोहोळचा पोपट काल खूप बोलून गेला, पण, भालके काय चीज आहे, ते त्याला दाखवतो;भालकेंचे उमेश पाटलांना चॅलेंज

मागील महिन्यात 31 मे ला चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याचे नाव अहमदनगर वरून अहिल्यादेवी नगर असं घोषित केलं. त्यानंतर पुन्हा एकदा नगर जिल्हा विभाजनाचा विषय ऐरणीवर आला. त्यातच नुकतेच राज्य सरकारने शिर्डी येथे अजून एका अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास मंजुरी दिली. त्यानंतर जिल्हा विभाजनानंतर जिल्ह्याचे ठिकाण शिर्डी होणार का? असा प्रश्न चर्चेत आलेला आहे.

या अनुषंगाने राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारला असता त्यांनी आता नव्याने जिल्हा विभाजन करणे शक्य नसल्याचे स्पष्टपणे मत व्यक्त केलं. आपण महसूल मंत्री असताना राज्यातील ठाणे जिल्ह्यातून पालघर हा स्वतंत्र जिल्हाची निर्मिती झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यावेळेसच नवीन जिल्ह्याची निर्मिती करणे हे प्रशासनाच्या दृष्टीने मोठे जिकरीचं काम असल्याने यापुढे नव्याने कोणत्याही जिल्ह्याची निर्मिती न करण्याचा निर्णय त्यावेळीच घेण्यात आलेला होता, अशी माहिती थोरात यांनी दिली.

Balasaheb Thorat On Ahmednagar District Division :
Bhagirath Bhalke : केसीआर यांनी पाठ फिरवताच भगीरथ भालकेंनी राजकीय भूमिका बदलली...

एक नवीन जिल्हा निर्माण करण्यासाठी जवळपास 56 वेगवेगळ्या प्रकारचे कार्यालय त्या ठिकाणी असावी लागतात. त्यासाठी मोठ्या इमारती, अधिकारी, इतर कर्मचारी वर्ग अशी मोठी व्यवस्था उभी करावी लागते. ज्या जिल्ह्यांचे नव्याने निर्मिती केली त्या ठिकाणीच अजून पर्यंत पूर्णपणे व्यवस्था देता आलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये आता नव्याने जिल्हा निर्मिती करणे सरकारला शक्य नसल्याचं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. त्यामुळे नवीन जिल्हा नको, हेच धोरण असल्याचं त्यांनी एक प्रकारे सांगितले आहे. (Latest Marathi News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com