Satej Patil: सतेज पाटलांनी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून पुन्हा बॉम्ब फोडला

Kolhapur News Congress will contest eight constituencies: दहापैकी आठ मतदारसंघात त्यांनी काँग्रेसकडे घ्याव्यात अशी मागणी पुणे येथे झालेल्या बैठकीत केली आहे. बैठकीत 10 विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे असलेले इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
Satej Patil
Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमधील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, आणि शिवसेना ठाकरे गटांमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. मात्र काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा बॉम्ब फोडला आहे.

सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील दहापैकी आठ मतदारसंघांमधून लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्याबाबतची मागणी नुकतीच करण्यात आली. पुणे येथे झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक इच्छुकांच्या आढावा बैठकीत पाटील यांनी केवळ कागल आणि शाहूवाडी मतदारसंघ सोडून सर्वच जागांवर लढण्याची तयारी दर्शवली आहे. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून पाच जागांची तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन जागांची मागणी होत आहे. काँग्रेसने किती जागा घ्यावात याबाबत अद्याप कोणीही भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे महाविकास आघाडीतील जिल्ह्यातील प्रमुख घटक असून कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्या पार्श्वभूमीवर दहापैकी आठ मतदारसंघात त्यांनी काँग्रेसकडे घ्याव्यात अशी मागणी पुणे येथे झालेल्या बैठकीत केली आहे. बैठकीत 10 विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे असलेले इच्छुक उमेदवार उपस्थित होते.

Satej Patil
Jayant Patil News: माढा लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही महायुतीला धक्का देणार; जयंत पाटलांनी ताकद लावली

जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली आहे. दहापैकी आठ मतदारसंघात निवडणूक लढवण्याची ताकद आपली आहे. जागा वाटपात जास्तीत जास्त जागा काँग्रेसकडे घ्या. निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे, असेही पाटील म्हणाले आहेत. काँग्रेसने कागल आणि शाहूवाडी मतदारसंघ वगळता इतर आठ मतदारसंघात मोर्चे बांधनी केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे सहा आमदार

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे सहा आमदार आहेत. त्यातील चार आमदार हे विधानसभेचे तर दोन आमदार विधान परिषदेचे आहेत. कोल्हापूर उत्तरमधून जयश्री जाधव, कोल्हापूर दक्षिण मधून ऋतुराज पाटील, हातकणंगले मधून राजू बाबा आवळे तर करवीरमधून दिवंगत आमदार पीएन पाटील हे विधानसभेचे आमदार आहेत. जयंत पाटील आसगावकर आणि काँग्रेस नेते सतेज पाटील हे विधान परिषदेचे आमदार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com