Lok Sabha Election Update : EVM मध्ये घोळाची भाजपलाही भीती; मतांच्या पडताळणीसाठी सुजय विखेंसह तिघांची धाव

Election Commission of India Lok Sabha Election 2024 EVM Verification BJP : देशातील आठ लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मतांच्या पडताळणीसाठी सहा अर्ज आले असून त्यापैकी तीन अर्ज भाजप उमेदवारांचे आहेत.
Election Commission BJP Congress
Election Commission BJP CongressSarkarnama

New Delhi : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएच्या बैठकीत ईव्हीएमच्या मुद्यावरून विरोधकांना टोला लगावला होता. ईव्हीएम जिवंत आहे की मेलं, असं विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर बंदी आणण्याची आपली मागणी कायम ठेवली होती. पण ईव्हीएममधील घोळाची भीती भाजपलाही असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशीनमधील मतांच्या पडताळणीसाठी सहा राज्यांतून एकूण आठ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यामध्ये भाजप आणि काँग्रेसच्या प्रत्येकी तीन उमेदवारांचे अर्ज आले आहेत.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातून एकच अर्ज प्राप्त झाला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी अर्ज केला असून तब्बल 40 मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनमधील मतांची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.

Election Commission BJP Congress
Governor CV Ananda Bose : पोलिसांकडूनच माझ्या जीवाला धोका! राज्यपालांच्या दाव्याने खळबळ

अहमदनगरसह तमिळनाडूतील वेल्लोर आणि तेलंगणातील जहिराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारांनीही पडताळणीसाठी अर्ज दाखल कला आहे. तमिळनाडूतील विरुधनगरमधील डीएमडीकेच्या उमेदवारानेही अशी मागणी केली आहे.

काँग्रेसच्या छत्तीसगडमधील कंकेर तर हरियाणातील करनाल आणि फरिदाबाद मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज आले आहेत. तर आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसच्या विझीनागरम मतदारसंघातील उमेदवारानेही पडताळणीसाठी अर्ज केला आहे. आठ मतदारसंघातील एकूण 92 मतदान केंद्रातील ईव्हीएममधील मतांची पडताळणी करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे. त्यापैकी सर्वाधिक 40 केंद्र एकट्या अहमदनगरमधील आहेत.

Election Commission BJP Congress
Rahul Gandhi on PM Narendra Modi : मोदींनी रशिया-युक्रेन युध्द थांबवलं पण..! राहुल गांधी संतापले

दरम्यान, नगरमध्ये सुजय विखे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांनी पराभव केला आहे. या मतदारसंघात नीलेश लंके जायंट किलर ठरले आहेत. त्यामुळे विखे यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी केलेल्या अर्जाला महत्व प्राप्त झाले आहे. आता त्यातून मतांच्या आकडेवारीत काय बदल होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com