Praniti Shinde : महिला, मुली सुरक्षित नाही; खासदार प्रणिती म्हणाल्या, 'गृहखाते झोपलंय'

Congress MP Praniti Shinde criticized the mahayuti government during her visit to Satara : काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी महायुती सरकारच्या गृहखात्याच्या कारभारावर टीका केली.
Praniti Shinde
Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Satara Congress News : राज्यात महिला व मुलीवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे महायुती सरकारवर चांगल्या भडकल्यात.

"महिला आणि मुलींवरील अत्याचाऱ्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, काही विकृत लोक हे चिमुरड्या मुलींनाही सोडत नाहीत. जिजाऊ, सावित्रीबाईंच्या या पुरोगामी महाराष्ट्रात महिला मानसिकदृष्ट्या सक्षम राहिल्या नाहीत. त्यांचे जगणे मुश्कील झाले असताना गृहखाते झोप काढत आहे. या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही", असा टोला खासदार प्रणिती शिंदे यांनी लगावला.

काँग्रेसकडून इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेण्यासाठी खासदार शिंदे आज साताऱ्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत काँग्रेस (Congress) भवनात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, नरेश देसाई, रणजितसिंह देशमुख आदी उपस्थित होते.

Praniti Shinde
Dattatray Bharne: हर्षवर्धन पाटलांचं 'तुतारी' वाजवायचं ठरलं; दत्तामामांनी टाकली 'गुगली'; म्हणाले,'अजून माझी उमेदवारीच...'

खासदार शिंदे म्हणाल्या, ‘‘जिल्ह्यात काँग्रेस विचारांचा एकच आमदार असून, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आमदारांची संख्या वाढावी. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीत (Election) जे चित्र दिसून आले. त्यापेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात चांगले वातावरण आहे". राज्यातील शेतकरी, महिला या महायुती सरकारला वैतागल्या असल्याचाही टोला खासदार शिंदे यांनी लगावला.

Praniti Shinde
Rahul Gandhi News: मोठी बातमी! राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा तडकाफडकी रद्द, 'हे' कारण आलं समोर

'बदलापूर, पुणे येथील घटना पाहता सध्या महिला, मुलीवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. विकृत लोक चिमुरड्यांनाही सोडत नाहीत. अशा विकृत मानसिकतेची नवरात्रोत्सवातच वध करण्याची गरज आहे. युतीचे सरकार मते विकत घेत असून, अन्याय करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानही महायुतीच्या सरकारनेच केला आहे', असा घणाघात प्रणिती शिंदे यांनी केला.

राज्यात सुमारे 64 हजार मुली बेपत्ता

'महायुतीचे सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणून मते विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात सुमारे 64 हजार मुली बेपत्ता आहेत. त्यावर गृहविभाग काहीच करताना दिसत नाही. निवडणूक लागली, की महायुती सरकारला लाडकी बहीण आठवली', असाही टोला खासदार शिंदे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com