Dattatray Bharne: हर्षवर्धन पाटलांचं 'तुतारी' वाजवायचं ठरलं; दत्तामामांनी टाकली 'गुगली'; म्हणाले,'अजून माझी उमेदवारीच...'

Harshvardhan Patil Will Join NCP (SP) : हर्षवर्धन पाटील यांच्या शरद पवारांच्या पक्षात जाण्याच्या निर्णयामुळे अजित पवारांचे आमदार दत्तात्रय भरणे यांचं इंदापूर विधानसभा निवडणुकीत तिकीट फिक्स असल्याचं आता जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे.
Dattatray Bharne, Harshvardhan Patil
Dattatray Bharne, Harshvardhan Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर पुढील राजकीय वाटचालीचा सस्पेन्स संपवला आहे. त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते.

तसेच महायुतीतील अजित पवारांच्या एन्ट्रीनंतर प्रचंड दुखावलेल्या हर्षवर्धन पाटलांनी अखेर भाजपची साथ सोडत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे. या त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशावर त्यांचे कट्टर राजकीय विरोधक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्या शरद पवारांच्या पक्षात जाण्याच्या निर्णयामुळे अजित पवारांचे आमदार दत्तात्रय भरणे(Dattatray Bharne) यांचं यंदाही इंदापूर विधानसभा निवडणुकीत तिकीट फिक्स असल्याचं आता जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. याचमुळे हर्षवर्धन पाटलांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे.

हर्षवर्धन पाटलांना 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत पराभवाचा धक्का दिलेल्या अजित पवारांचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मोठी गुगली टाकली आहे. ते म्हणाले,अद्यापपर्यंत महायुतीचे जागावाटप झालेले नाही. मला तिकीट मिळणार आहे का नाही? हे मला देखील माहीत नाही. माझी उमेदवारीच अजून जाहीर झालेली नाही, पण हर्षवर्धन पाटील यांनी असा निर्णय का घेतला हे त्यांनाच विचारावा लागेल असं आमदार भरणे यांनी म्हटलं आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी जो निर्णय घेतला आहे, त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. कारण ते हे मोठे नेते आहेत.त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी असा निर्णय का घेतला हे त्यांनाच विचारावा लागेल असंही आमदार दत्तात्रय भरणेंनी सांगितलं.

Dattatray Bharne, Harshvardhan Patil
MNS Vs Mahayuti: 'मुंबईत शिवसेनेचा एकमेव खासदार, तोही मनसेमुळेच...'; 'या' नेत्यानं वर्सोव्यात आणला मोठा ट्विस्ट

शरद पवार काय म्हणाले..?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन पाटील यांचं आमच्या पक्षांमध्ये स्वागत करतो. राष्ट्रवादी प्रवेशाचे अशा पध्दतीचे असे अनेक धक्के येत्या काही काळात दिसून येतील. राष्ट्रवादीची विचारधारा ते मांडत असतील ते केव्हाही पक्षात येऊ शकतात,त्याचे स्वागत होईल,असं मतंही शरद पवारांनी व्यक्त केलं.

फडणवीसांचा पर्याय नाकारला...

हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दाखल होण्यामागचं इंदापूर विधानसभेची जागा विद्यमान आमदार असलेल्या पक्षाला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दुसरा पर्याय आपण काढू असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मात्र, दुसरा पर्याय स्वीकारणे आमच्या कार्यकर्त्यांना मान्य झाले नसते. तसे केल्यास तो माझा व्यक्तिगत निर्णय ठरला असता. मात्र प्रश्न जनतेचा आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतोय.

Dattatray Bharne, Harshvardhan Patil
Cabinet Decisions : जैन, बौध्द, बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजासाठी सरकारने उघडली तिजोरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय

माझा प्रवेश कधी होईल? हे माझ्या हातात नाही, असंही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं. पवारसाहेबांनी आपल्या कुटुंबाचे व्यक्तिगत संबंध आहेत. येणाऱ्या काळात राजकीय वनवास राहणार नाही. नवीन विकासाचे पर्व सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. आपला रोल फक्त पक्षात प्रवेश करणं आहे. बाकीचा रोल त्यांचा आहे तारीख त्यांची असेल, असंही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com