Congress News : मंगळवेढा काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर; तालुकाध्यक्षाच्या नियुक्तीवरुन राजकारण पेटलं

Congress News : नाराज कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडं तक्रार करणार
Congress , Sushilkumar Shinde
Congress , Sushilkumar Shinde Sarkarnama
Published on
Updated on

गुरूदेव स्वामी

Congress News : माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी प्रशांत साळे यांची काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मात्र, या नियुक्तीवरुन काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर असून याविषयी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचं समोर आलं आहे. यावरुन काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde)व जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी मंगळवेढा तालुका कॉग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी हुन्नुरमधील प्रशात साळेंची निवड केली आहे. दक्षिण भागातील युवकामध्ये नवचैतन्य संचारलं असतानाच माजी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. नंदकुमार पवार यांनी या निवडीवर ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं मत विचारात घेतलं नसल्याची भावना स्थानिक पातळीवर आहे.

Congress , Sushilkumar Shinde
Satara : अजितदादांनी वैचारीक मोठेपणा दाखवावा...शहाजीबापू

याचवेळी पक्षश्रेष्ठींनी सबुरीनं घेण्याचा सल्ला दिल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. याच धर्तीवर तालुकाध्यक्ष निवडीवरून निर्माण झालेला हा वाद काँग्रेसचं वरिष्ठ नेतेमंडळी कसे सोडवतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

माजी मंत्री शिंदे यांच्या तालुक्यातील राजकीय प्रवासात पहिल्या टप्प्यापासून विधानसभा व लोकसभा निवडणुकीत खंबीर साथ दिली. प्रशांत साळे यांनी डिजिटल सदस्य नोंदणी अभियानात तालुक्यात सर्वात जास्त नोंदणी केल्यानं काँग्रेसमधील शिंदे व मोहिते गटांनी पुन्हा तालुक्यात गतवैभव प्राप्त करण्यासाठी तालुकाध्यक्ष पदावर मागासवर्गीय युवकास संधी दिल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साह पसरले होते.

मात्र, माजी अध्यक्ष अँड.नंदकुमार पवार यांनी नव्या निवडीसंदर्भात नाराजी व्यक्त करत सदर निवड ज्येष्ठांना डावलून झाली असल्याचा आरोप केला आहे. तसेच या निवडीवरुन निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते नाराज असून आम्ही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडं तक्रार करणार असल्याचं उघड उघड मत व्यक्त केलं आहे.

Congress , Sushilkumar Shinde
Nitesh Rane's Angry Reaction : अजितदादांनी 'टिल्ल्या' म्हटल्याने नितेश राणे संतप्त ; टि्वट करुन दिलं 'हे' उत्तर

राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेला देशात सहभाग वाढत असताना आगामी नगरपलिका व जि.प. व प.स निवडणुकीच्या दृष्टीने ग्रामीण भागात तरुणांची फळी उभी करण्याची गरज असून सध्या काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण भागात किती शाखा आहेत. शिवाय ग्रामीण भागातील प्रश्‍नासाठी किती वेळा आवाज उठवत त्यांच्याशी जवळीक ठेवली याचे आत्मचिंतन करण्याची गरज असून आता पुन्हा अध्यक्षपदावरुन सुरु झालेल्या वादावर काँग्रेस श्रेष्ठी पद्धतीने कसा तोडगा काढतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com