Satara : इंग्रजांना मदत करण्यासाठीच काँग्रेसचा जन्म होता : अजयकुमार मिश्रांची जहरी टीका

Karad उंब्रज (ता. कराड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे दुर्बल घटक संवाद मेळावा कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा बोलत होते.
Ajaykumar Mishra
Ajaykumar Mishrasarkarnama
Published on
Updated on

Umbraj News : काँग्रेसची Congress देशातील सत्ता गेल्यामुळे ते हताश होऊन पंतप्रधान मोदींना शिव्या देत आहेत. काँग्रेसचा जन्म इंग्रजांना मदत करण्यासाठी झाला होता. तर, काँग्रेस पक्षाची निर्मिती करणारे हे इंग्रज होते. सर्वप्रथम संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी प्रथम सरसंघ चालक हेगडेवारांनी केली. मुळ संविधानात नसलेले कलम ३७० लावण्याचे काम काँग्रेसने केले. त्यामुळे मोदी सरकारला अनेक अडचणी निर्माण झाल्या असल्याचे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा Ajaykumar Mishra यांनी व्यक्त केले.

उंब्रज (ता. कराड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे दुर्बल घटक संवाद मेळावा कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी अतुल भोसले, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, प्रदेश कार्यकारणी सदस्य भरत पाटील, रामकृष्ण वेताळ, कराड उत्तर भाजप अध्यक्ष महेशकुमार जाधव, रिपाई कराड तालुकाध्यक्ष उत्तमराव कांबळे, सुरेश पाटील व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

अजयकुमार मिश्रा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने देशात अनेक स्वातंत्र्यवीर निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा व्यापक प्रभाव देशाच्या संस्कृती आणि इतिहासावर पडला आहे. दोनशे वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांनी सामाजिक विषयावर उठाव करून त्यावर समाधानकारक काम केले.

Ajaykumar Mishra
Satara : 'रयत' करणार 'आयबीएम'शी करार; विद्यार्थ्यांना नोकरीची हमी : पवार

स्वातंत्र्यानंतरची भारताची संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती. परंतु स्वातंत्र्यानंतरचे सरकार हे आंबेडकरांच्या विचाराचे नव्हते. आंबेडकरांना निवडणुकीत हरवण्याचे काम त्यावेळीचे सरकार व पंतप्रधान यांनी केले. त्यांना सन्मान मिळून न देण्याचे अनेकवेळा प्रयत्न झाले होते. नरेंद्र मोदी दुर्बल व गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना राबवून त्यांना सक्षम बनवण्याचे काम करत आहेत. देशाला ताकदवान बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मोदींनी एकसंघ भारत बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Ajaykumar Mishra
Congress : डॉ. सुधीर तांबे यांच्यानंतर सत्यजीत तांबे यांच्यावरही निलंबनाची टांगती तलवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com