Satara : 'रयत' करणार 'आयबीएम'शी करार; विद्यार्थ्यांना नोकरीची हमी : पवार

Sharad Pawar खासदार शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त तसेच रयत शिक्षण संस्थेतील 50 वर्षांच्या सक्रिय योगदानाबद्दल अभिष्टचिंतन आणि कृतज्ञता सोहळा आज साताऱ्यात झाला.
Sharad Pawar, Raghunath Mashelkar
Sharad Pawar, Raghunath Mashelkarsarkarnama
Published on
Updated on

Satara News : रयत शिक्षण संस्थेने सर्वापर्यंत शिक्षण पोचविण्याचे कार्य केले. आता जगातील बदलांची नोंद घेत संस्था आता वेगळ्या वळणावर आली आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या आयबीएमशी करार करून आर्टीफिशियल इंटेलिजन्सीचे (कृत्रीम बद्धीमत्ता़) ज्ञान घेण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. हा विषय नेहमीच्या शिक्षणाबरोबर घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची हमी दिली जाईल, अशी ग्वाही रयत शिक्षण संस्थेचे Rayat Shikshan Sanstha अध्यक्ष खासदार शरद पवार Sharad Pawar यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात खासदार शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त तसेच रयत शिक्षण संस्थेतील 50 वर्षांच्या सक्रिय योगदानाबद्दल अभिष्टचिंतन आणि कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते.

यावेळी सिंबॉयसिसचे डॉ. शा. ब. मुजुमदार, खासदार श्रीनिवास पाटील, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, उपाध्यक्ष ॲड. भगिरथ शिंदे, सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव, प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, प्राचार्य राजेंद्र साळुंखे, आमदार बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, शशिकांत शिदे, मॅनेजिंग कौंन्सिलचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Sharad Pawar, Raghunath Mashelkar
Sharad Pawar : "स्वत:च्या राज्यात ज्यांना..." पवारांनी काढला नड्डांना चिमटा!

श्री. पवार म्हणाले, कर्मवीरांनी सर्वसामान्यांपर्यंण शिक्षण पोचविले. रयत देशातील सर्वात महत्वाची संस्था आहे. आता रयत वेगळ्या वळणावर आहे. डॉ. अनिल पाटील यांनी खांद्यावर जबाबदारी घेऊन प्रारंभ केला आहे. जगातील बदलांची नोंद घेऊन त्याप्रमाणे शिक्षण देण्याची आज आवश्‍यकता आहे. त्यासाठी आम्ही जगातील सर्वात मोठी कंपनी आयबीएमसोबत कृत्रीम बुद्धीमत्तेचे ज्ञान देण्याची सुविधा उपलब्ध करणार आहोत.

Sharad Pawar, Raghunath Mashelkar
Satara News : अजित पवारांच्या विधानावर भुजबळ म्हणाले, मी अभ्यास करुन बोलेन

त्यासाठी त्या कंपनीशी करार होणार आहे. जे विद्यार्थी दहावी, बारावी तसेच पदवीधर होत असताना त्यांनी हा विषयही घ्यावा. अशा विद्यार्थ्यांना नोकरीची हमी दिली जाणार आहे. कर्मवीरांनी संस्था सुरु केली तेव्हा शिक्षित आणि अशिक्षित अशी स्थिती होती. आता परिस्थिती वेगळी आहे. विद्यार्थ्यामध्ये वैचारीक दृष्टीकोन वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Sharad Pawar, Raghunath Mashelkar
Sharad Pawar News : छत्रपती संभाजीराजांना 'धर्मवीर' बोलणं चुकीचं नाही ; पवारांची भूमिका!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com