Kolhapur Politics 'भारत जोडो'नंतर आता काँग्रेस गाव-तालुका जोडणार ; रविवारपासून 'जनसंवाद पदयात्रा

Congress News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो'ला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला.
Congress News
Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

Janasamwad Pad yatra News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. केरळ ते जम्मू काश्मीरपर्यंत देश पादाक्रांत करत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काँग्रेसचा हात बळकट केला. आता गाव-तालुका स्तरावर काँग्रेसची वज्रमूठ साकारण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने रविवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रेला सुरुवात होत आहे. "यात्रा संवादाची, बांधिलकी लोक भावनेची" असा गजर करत काँग्रेसचे कार्यकर्ते गावोगावी जाणार आहेत.

कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा जिल्ह्यात संपन्न होणार आहे. ३ ते ५ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या यात्रेत काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. 3 सप्टेंबर रोजी चंदगड तालुक्यातील तांबुळवाडी येथून सकाळी 7:30 वाजता या यात्रेला सुरुवात होणार आहे. तर 5 सप्टेंबरपर्यंत ही यात्रा आजरा, गडहिंग्लज, गारगोटी, भुदरगड, राधानगरी या तालुक्यात फिरणार आहे.

Congress News
Kolhapur Politics : भ्रष्टाचारी अमन कोल्हापुरात नकोच ; भाजपा जिल्हाध्यक्ष नाईक-निंबाळकरांनी दिला इशारा

भाजपाविरोधात काँग्रेस गावागावात

सध्या देशातील राजकीय, सामाजिक, धार्मिक स्थिती बिघडत चालली आहे. त्या विरोधात काँग्रेस (Congress) आपली भूमिका घेऊन भाजपचा खोटा चेहरा समोर आणण्यासाठी गावोगावी जाणार आहे. भाजपच्या (BJP) विरोधात यात्रेच्या माघ्यातून रान उठवणार आहे.

काँग्रेसच्या यात्रेचा उद्देश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील 'रयतेचे राज्य व फुले, शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्टाचे पुरोगामित्व अबाधित ठेवणे, शांतता ठेवणे.

संविधान टिकवणे आणि सामाजिक ऐक्य कायम राखणे. जाती-धर्मात द्वेष व फुट पाडण्याचे पडयंत्र मोडून काढून 'नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान' हा प्रेमाचा संदेश घरोघरी पोहचवणे. महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणे. बेरोजगारी विरोधात आवाज उठवणे.

Congress News
Ashok Chavan On Maratha Reservation : आंदोलन चिरडता येणार नाही, मराठा आरक्षण कसे देणार ? सरकारने भूमिका स्पष्ट करावी...

मणिपुरमध्ये महिलांची नग्रावस्थेत काढलेली धिंड, देशात महिलांवर वाढत्या अत्याचाराविरोधात न्याय मागणे. शेतकऱ्यांना ६ हजार रुप्यांचे गाजर दाखवत खते, शेतीची अवजारे यांची दरवाढ करून चालवलेल्या डबल लुटीचा पर्दाफाश करणे. सत्तापिपासू भाजपकडून सत्तेच्या हव्यासापोटी देशात व राज्यात सुरु असलेले लोकशाहीचे अध: पतन थांबवणे

विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडी, सीबीआय अशा यंत्रणांचा गैरवापर आणि तोडाफोड़ीच्या राजकारणाविरोधात आवाज उठवणे. पीएम केअर फंड, आयुष्मान भारत योजना, भारत माला परियोजना, रस्ते बांधकामातील कॅंगने उघड केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com