Sadabhau Khot On Tomato Price: दोन-तीन महिने कळ काढा, नंतर सरण रचायला टोमॅटो वापरा; माजी मंत्री सदाभाऊंचं वादग्रस्त विधान!

Sadabhau Khot Statement : सिंलेडर महागलं आहे, त्यावर अनुदानाची मागणी करा; शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत असतील अडचण काय?
Sadabhau Khot Statement :
Sadabhau Khot Statement :Sarkarnama
Published on
Updated on

Controversial Statement of Sadabhau Khot : टोमॅटोचे भाव सद्या गगनाला भिडले आहेत. टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या भाववाढीवरून राजकारण सुद्धा तापले आहे. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी एक अजब वक्तव्य केले आहे. टोमॅटो मिळालं नाही म्हणून कुणी टाचा कोरून मेलं आहे का? असे विधान खोत यांनी केले आहे.

Sadabhau Khot Statement :
Beed Ncp Crisis News : इकडे मंत्रीपद, तिकडे काय ? मेरे पास शरद पवार है...

सदाभाऊ खोत म्हणाले, टोमॅटो नाही मिळाले म्हणून कुणी टाचा कोरून मेलं आहे का? टोमॅटो-टोमॅटो काय करताय? गॅस सिलिंडरइतकं महाग झालंय, सिलेंडरवर अनुदान द्यावी अशी मागणी सरकारकडे करा, टोमॅटो पीक आता स्वीस बँकेत ठेवण्याची आवश्यकता आहे, असे खोत म्हणाले.

टोमॅटो हा काही अणुबॉम्ब नाही. दोन-तीन महिन्यांचा कळ काढायला पाहिजे. यानंतर ज्याला कुणाल टोमॅटो लागतात, त्याला आम्ही सरण रचण्यासही टोमॅटो देऊ, मग सरणासाठी लाकडं नाही टोमॅटो वापरा असं वादग्रस्त विधान खोत यांनी केलं आहे.

या आधीसुद्धा मी कांदा परवडत नाही तर टोमॅटो खा असा सल्ला दिला होता. आता ही सुद्धा तुम्हाला टोमॅटो परवडत नसतील तर कांदे खा असं म्हणतो. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला की, त्यांच्या नावने ओरड केली जाते. अशामुळे शेतकऱ्यांच्या मालाची माती होईल.

Sadabhau Khot Statement :
Ambadas Danve On Shinde-Pawar : अजित पवारांना मुख्यमंत्री अन् शिंदेना अर्थमंत्री करा, दानवेंचा अजब सल्ला..

दोन पैसे गावतल्या शेतकऱ्यांना मिळणार असतील तर काय हरकत आहे. एक किलो टोमॅटो खात असाल तर अर्ध्या किलोवर या. अर्धा किलो लागत असेल तर पावशेरवर या. आणि अगदीच ज्यांना टोमॅटो घेणे परवडत नाही, त्यांनी दोन तीन महिने टोमॅटो खाऊ नका, टोमॅटो जर नाही खाल्ला तर मरायला लागलाय? असाही सवाल सदाभाऊ खोत यांनी केला. (Controversial statement of Sadabhau Khot on tomato price hike)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com