पाणी प्रश्नावरुन काळे-कोल्हे समर्थकांची हमरीतुमरी

कोपरगाव ( Kopargaon ) येथील कृष्णाई मंगल कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली.
Controversy among Kale-Kolhe supporters over water issue
Controversy among Kale-Kolhe supporters over water issueSarkarnama
Published on
Updated on

कोपरगाव ( अहमदनगर ) : कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. पाणी प्रश्नावर झालेली ही बैठक राजकीय वादामुळे राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. Controversy among Kale-Kolhe supporters over water issue

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे होते. व्यासपीठावर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, सभापती पौर्णिमा जगधने, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, राजेंद्र जाधव उपस्थित होते. बैठकीला काळे व कोल्हे समर्थक कार्यकर्तेही उपस्थित होते.

Controversy among Kale-Kolhe supporters over water issue
आशुतोष काळे म्हणाले, नगरपालिकेत सत्ता मिळविण्यासाठी कामाला लागा

अधिकाऱ्यांनी आवर्तनच्या तारखा जाहीर न केल्याने तालुक्यात बैठक घेऊन शेतकऱ्यांचा फायदा काय, असा सवाल कोल्हे कारखान्याचे संचालक प्रदीप नवले यांनी केल्यावर काळे-कोल्हे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनीही भाजपच्या काळात सल्लागार समितीच्या बैठका मंत्रालयात होत होत्या, ते कसे चालत होते, असे प्रत्युत्तर दिले. बैठकीनंतरही काळे-कोल्हे समर्थकांत वाद झाले.

बैठकीत आमदार काळे म्हणाले, गोदावरी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सात नंबर फॉर्म भरून पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी नोंदवावी. पाणी कसे घ्यायचे, ते मी पाहतो, असे आवाहन करत चालू हंगामात दारणा धरणेक्षेत्रातील सर्व धरणे तुडुंब भरलेली असल्याने पाटबंधारे खात्याने रब्बी व उन्हाळी हंगाम मिळून किमान पाच आवर्तने द्यावीत व तसे नियोजन करावे. आवर्तनाच्या आधी चाऱ्यांची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केले.

Controversy among Kale-Kolhe supporters over water issue
स्नेहलता कोल्हे यांनी पिचड कुटुंबीयांना भेटून दिली श्रद्धा व सबुरीची शाल

वाढलेली पाणीपट्टी, ब्लॉकधारकांचे हक्क, समन्यायी पाणी वाटप कायद्यात बदल, मेंढेगिरी अहवालातील बदल, हे विषय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे मांडून त्याबाबत लवकरच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या समवेत तालुक्यातील शिष्टमंडळाची बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल, असेही काळे यांनी यावेळी सांगितले.

कार्यकरी अभियंता शिंदे यांनी गोदावरी कालव्याला दोन रब्बी व दोन उन्हाळी, असे चार आवर्तन देण्याचे जाहीर केले. त्यावर उपस्थित शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत विभागाचा निषेध केला. माहिती अधिकार कार्यकते संजय काळे म्हणाले, आम्हाला दरमहा पाण्याचे आवर्तन दिले पाहिजे. गोदावरी लाभक्षेत्रत पाऊस उशिरा पडतो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना में ते ऑगस्ट या काळात एक थेंब मिळत नाही. यावेळी चंद्रशेखर कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, साहेबराव रोहोम, प्रवीण शिंदे, कैलास माळी, राजेंद्र खिलारी, सोमनाथ चांदगुडे, सुनील देवकर, रूपेश काले यांनी समस्या मांडल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com