मंगळवेढा (जि. सोलापूर) : स्वागताच्या डिजिटल फलकावरील फोटोवरून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) आणि युवक काँग्रेसचे (Congress) मंगळवेढा (Mangalveda) तालुकाध्यक्ष संदीप फडतरे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. याच कारणावरून भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) धूसफूस सुरू आहे. त्यामुळे मंगळवेढ्यात फलकाचा वाद चवीने चर्चिला जात आहे. (Controversy between Congress's Sandeep Fadtare and NCP's Umesh Patil over the photo on digital board)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या संत दामाजीपंत, चोखामेळा आणि कान्होपात्रा या संतांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी नुकत्याच मंगळवेढ्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी सुरुवातीला रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल शहा यांच्या निवास स्थानी भेट दिली. त्या ठिकाणी सुळे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
युवक काँग्रेसचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष संदीप फडतरे यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे येथील पदाधिकाऱ्यांची तक्रार केली. ‘राष्ट्रवादीचे येथील पदाधिकारी प्रोटोकॉल पाळत नाहीत. (स्व.) आमदार भारत भालके आणि भगिरथ भालके यांचे डिजिटल फलक व प्रसिद्धी माध्यमांना जाहिरात देताना फोटो लावण्याचे टाळले जाते. वापरले तर ते प्रोटोकॉलनुसार नसतात. पक्षाचे काम करत असताना आमच्यावर केसेस दाखल होतात आणि पदासाठी पुढे पुढे करणाऱ्याला संधी मिळते,’ अशी तक्रार फडतरे यांनी केली.
फडतरे यांच्या तक्रारीवर खासदार सुळे यांनी आपला हा दौरा राजकीय दौरा नसून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून संतांच्या दर्शनाचा आणि परिसर अभ्यासाचा दौरा असल्याचे सांगितले. तुमची काय तक्रार असेल तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कानावर घालण्याचे सांगून त्या संत चोखोबांच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाल्या. या वेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनाही सोबत घेतले नाही.
सुप्रिया सुळे या संतांच्या दर्शनासाठी निघून गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील आणि युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप फडतरे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाले. त्याचेही निमित्त मंगळवेढ्यात लावलेले डिजिटल फलक ठरले. या बाचाबाचीत आपल्याला फार मोठा राजकीय वारसा नसून माझे वडिल आमदार नाहीत, असा दाखला दोघांकडूनही देण्यात आला. एकूणच डिजिटल फलकावरील फोटोवरून मंगळवेढ्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही धूसफूस सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.