Maharashtra Co-operative Societies : सहकारी संस्थांच्या निवडणुका कधी? 400 हून अधिक संस्था प्रतिक्षेत

Local Government Elections Maharashtra Politics:महापालिका, जिल्हा परिषद यांच्याही निवडणुका झालेल्या नाहीत. त्या तुलनेत सहकारी संस्थांच्या निवडणुका केवळ वर्षभर लाबंल्या आहेत. त्यामुळे खरंच यावर्षात तरी निवडणूक होणार काय?
Cooperative Election
Cooperative ElectionSarkarnama
Published on
Updated on

अनेक सहकारी संस्था निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत. 2024 मध्ये तीन वेळा या निवडणुकींना स्थगिती मिळाली. मात्र 31 डिसेंबर रोजी मिळालेल्या तिसऱ्या स्थगितीचा कालावधी संपला आहे. सहकार खात्याकडून पुढील आदेश न आल्याने जिल्ह्यातील सहकारी संस्थेच्या निवडणुका नेमक्या कधी होणार? याबाबत संस्था चालकांसह सभासदांना उत्सुकता लागली आहे.

राजकारणातील पहिला टप्पा म्हणून या निवडणुकांकडे बघितले जाते. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतर प्रतीक्षेत असलेल्या सहकारी संस्थेच्या निवडणुका केव्हा होणार याची उत्कंठा लागून राहिली आहे.

Cooperative Election
Jitendra Awhad: अजितदादांना 'या' गोष्टी कशा खपतात? आव्हाडांचा सवाल; वाल्मिकने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात...

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांपासून पुढे बॅकांपर्यतच्या निवडणुकापर्यंत निवडणुका म्हणजे राजकारणातील पहिली पायरी होय. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख काही संस्था आणि छोट्या-मोठ्या जवळपास 400 हून अधिक सहकारी संस्था निवडणुकांच्या प्रतीक्षेत आहेत.

Cooperative Election
Kolhapur news: Instagram वरील 'सिंघम'कडून रिलसाठी सरकारी शाळेची नासधूस; ग्रामस्थांकडून मुख्याध्यापकांना समज

सध्या निवडणुका होणार की नाही याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. महापालिका, जिल्हा परिषद यांच्याही निवडणुका झालेल्या नाहीत. त्या तुलनेत सहकारी संस्थांच्या निवडणुका केवळ वर्षभर लाबंल्या आहेत. त्यामुळे खरंच यावर्षात तरी निवडणूक होणार काय? असा प्रश्‍न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

सहकारी संस्थेच्या निवडणुकीच्या आदेशाला स्थगिती असली की नेमून दिलेल्या तारखेपर्यंतच ती स्थगिती संपते. दुसऱ्या दिवशी पुढील आदेश मिळत असतात. मात्र तीन ते चार दिवस उलटूनही सहकारी संस्थांच्या निवडणुकीबाबत पुढील आदेश आलेला नाही. त्यामुळे निवडणूक होणार आहे की त्याला पुन्हा स्थगिती मिळणार याबाबत संभ्रमावस्था आहे.

आगामी काळात येत्या एप्रिल महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेसह महापालिका जिल्हा परिषद निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश कोणत्याही क्षणी राज्य सरकारकडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्थगित मिळालेल्या सहकारी संस्थेच्या निवडणुका पुन्हा स्थगित केल्या जाऊ शकतात, अशी ही शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com