Wai : हिंदू व्होट बॅंक तयार करा : कालीचरण महाराज

Hindutva कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे सरकार सत्तेत आल्याने प्रतागडावरील अतिक्रमण हटविण्याची उत्सव समितीची मोहिम यशस्वी झाली, असे ही कालीचरण महाराज Kalicharan Maharaj म्हणाले.
Kalicharan Maharaj
Kalicharan Maharajsarkarnama
Published on
Updated on

वाई : छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजन समाजातील मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी लढा दिला होता. त्यांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकारण्यासाठी राजनीतीचे हिंदुकरण करण्याची गरज आहे. त्यासाठी जात, प्रांत व भाषा विसरून सर्व हिंदूंनी एकत्र येऊन आपली हिंदू व्होट बँक तयार करावी, असे मत हिंदू धर्म जागरण महासभेचे कालीचरण महाराज यांनी व्यक्त केले.

प्रतापगड उत्सव समितीतर्फे महागणपती घाटावर आयोजित शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी गोरक्षक संजय शर्मा यांना वीर जीवा महाले, तर अभिवक्ता रोशन जगताप यांना पंताजीकाका बोकील अभिवक्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सियाचीन सीमेवरील जवान हेमंत तानाजी गाढवे यांचाही सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी शंकराचार्य पिठाचे राष्ट्रीय सचिव वेदमूर्ती ऋषिकेश वैद्य, शामजी महाराज, वीर जीवा महाले यांच्या वंशज श्रीमती सुमनताई सपकाळ, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज करणसिंह मोहिते, समितीचे उपाध्यक्ष विनायक सणस, पंडित मोडक, विराज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Kalicharan Maharaj
Satara : पुणे जिल्ह्यातून येऊन सातारा जिल्ह्यात गुरगुरत्यात... शाहजीबापूंचा राष्ट्रवादीला टोला

कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे सरकार सत्तेत आल्याने प्रतागडावरील अतिक्रमण हटविण्याची उत्सव समितीची मोहीम यशस्वी झाली, असे सांगून कालीचरण महाराज म्हणाले,‘‘गडावरील अफझल खान कबरीच्या परिसरात पुन्हा अतिक्रमण होऊ नये तसेच ही विषवल्ली वाढू नये, यासाठी ती मुळासकट नष्ट केली पाहिजे. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली मतांसाठी मुस्लिमांची पाठराखण करणाऱ्या राज्यकर्त्यांमुळे देशाचे तुकडे होत आहेत.’’

Kalicharan Maharaj
Patan : शंभूराज देसाई भडकले; म्हणाले, कोत्या मनाच्या लोकांना ते आवडले नसावे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com