Crime News : धक्कादायक! महिलेकडून बदनामीच्या भीतीने सरपंचाची आत्महत्या

crime sarpanch suicide : कृष्णा भावकू पाटील, शिवराज लक्ष्मण पाटील, ज्ञानदेव सुबराव पाटील, रघुनाथ जानबा पाटील, संजय विठ्ठल पाटील अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या घटनेनंतर हडलगे गावात त्याचे तीव्र पडसाद उमटले.
Vishnu Rama Patil
Vishnu Rama Patil sarkarnama
Published on
Updated on

Crime News : गावातील महिलेला आणि त्याच्या मुलाला हाताशी धरून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. म्हणून मी माझ्या प्रतिष्ठेला घाबरून आत्महत्या करत आहे, असा मेसेज व्हाट्सअप ग्रुपवर टाकत सरपंचाने आत्महत्या केली.

ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील हडलगे गावात घडली आहे. विष्णू रामा पाटील असे आत्महत्या केलेल्या सरपंचाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी विष्णू पाटील यांनी व्हाट्सअपवर त्यांची बदनामी करणासाठी महिलेला प्रोत्साहित करणाऱ्यांच्या नावांचा उल्लेख केला होता. त्यानुसार पाच जणांवर नेसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कृष्णा भावकू पाटील, शिवराज लक्ष्मण पाटील, ज्ञानदेव सुबराव पाटील, रघुनाथ जानबा पाटील, संजय विठ्ठल पाटील अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या घटनेनंतर हडलगे गावात त्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संशयिताना अटक करण्यासाठी आक्रमक झालेल्या विष्णू पाटील यांच्या नातेवाईक व ग्रामस्थांनी नेसरी पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती.

Vishnu Rama Patil
Assembly Election 2024 : लय बिघडलेलीच; विधानसभेलाही मोदी महाविकास आघाडीसाठी 'लकी' ठरणार?

संशयतांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. अन्यथा पोलिस ठाण्यासमोर किंवा संशयितांच्या घरासमोर मृतदेह दहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन यावेळी पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले, चंदगडचे निरीक्षक विश्वास पाटील, नेसरीचे सहायक निरीक्षक आबा गाढवे हे घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी जमावाला उप अधीक्षक इंगवले यांनी संशयितांना अटक करून कारवाईची ग्वाही दिल्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी केले.

मिळालेली माहितीनुसार, सरपंच पाटील यांचे गावात सरकार मान्य रेशन धान्य दुकान आहे. गावच्या सरपंच पदाचे काम देखील तेच पाहतात. रविवारी रात्री आठ वाजता गावातील एका व्हाट्सअप ग्रुपवर संशयित आरोपींची नावे लिहीत गावातील एका महिलेच्या आणि त्याच्या मुलालान हाताशी धरून माझी बदनामी सुरू आहे.

प्रतिष्ठेला घाबरून मी आत्महत्या करत आहे, असा मेसेज टाकला. ग्रामस्थांनी पाटील यांचा शोध घेतला. या प्रकाराची माहिती मिळताच नेसरी पोलिसांनी पाटील यांचा शोध घेतला. मोबाईल लोकेशन वरून घरापासून एक किलोमीटरवर असलेल्या गणेश मंदिराजवळील डोंगरात ते अत्यवस्थ स्थितीत आढळले. त्यांना तात्काळ गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला.

(Edited By Roshan More)

Vishnu Rama Patil
21 September in History : दहा वर्षांपूर्वीही युती-आघाडीचं घोडं अडलं होतं जागावाटपावरच; आजही तीच स्थिती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com