Babandada Shinde Viral Lettar : सोशल मीडियातील व्हायरल पत्रावरून आमदार बबनराव शिंदेंवर मराठा समाजाचा हल्लाबोल्ल

राज्यात दोन महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना या प्रश्नावर आमदार बबनराव शिंदे यांनी भूमिका मांडली नसल्याचे सांगितले जाते.
Babanrao shinde
Babanrao shindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी परशुराम महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र आमदार बबनराव शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १९ ऑक्टोबर रोजी पाठविली होते. हे पत्र मागील तीन दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर पेटलेला असताना त्यावर अवाक्षरही न बोलणारे आमदार शिंदे हे परशुराम महामंडळासाठी आग्रही आहेत, अशी टीका त्यांच्यावर समाज माध्यमांतून होत आहे. (Criticism from Maratha community on MLA Babanrao Shinde over viral letter in social media)

राज्यात दोन महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना या प्रश्नावर आमदार बबनराव शिंदे यांनी भूमिका मांडली नसल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणानंतर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती नेमली असून ही समिती मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात कुणबी-मराठा अशा नोंदी शोधत आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Babanrao shinde
Ajit Pawar Vs Jarange Patil : मराठा आरक्षणात आता तुम्हाला मिठाचा खडा टाकायचा आहे का?; जरांगे पाटलांचा अजितदादांना सवाल

मराठवाड्यात आज मराठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेकांच्या निजामकालीन शैक्षणिक व महसुली कागदपत्रांवर कुणबी असा उल्लेख आहे. याचा अभ्यास ही समिती करत आहे. मुक्तीपूर्व मराठवाड्यातील ५८ गावांचा सोलापूर जिल्ह्यात समावेश आहे. या ५८ गावांतील बहुंताश गावे माढा-मोहोळ व बार्शी तालुक्यातील आहेत.

मराठवाडा मुक्तीपूर्वी या परिसरात स्थापन झालेल्या मुक्तापूर स्वराज्याची राजधानी माढा तालुक्यातील जामगाव येथे होती. मागील एक महिन्यापासून याबाबत अनेक बातम्या प्रसिद्ध होऊनही त्याची कोणतीही दखल आमदार बबनराव शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील एकाही मराठा आमदाराने घेतली नव्हती. दुसरीकडे आमदार शिंदे हे ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकाम महामंडळाच्या स्थापनेसाठी पत्र देतात व मराठा समाजाच्या आरक्षणावर एक शब्दही बोलत नाही, त्यामुळे आमदार शिंदे यांच्यावर समाज माध्यमांतू टीकेचा भडिमार होत आहे.

Babanrao shinde
Drug Case : ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या; बाळासाहेब थोरात आक्रमक

प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ

याबाबत प्रतिक्रिया विचारण्यासाठी आमदार बबनराव शिंदे यांच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या स्वीय साहायकाकडून प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करण्यात आली.

Babanrao shinde
Maratha Reservation : आरक्षणप्रकरणी मराठा समाज आक्रमक; अजितदादांना बारामतीत घेराव, माढ्यात दाखविले काळे झेंडे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com