दशरथ सावंत म्हणाले, सीताराम गायकर हे गांडुळांचे नेते...

अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जवळ आली आहे.
Dashrath Sawant
Dashrath SawantSarkarnama
Published on
Updated on

अकोले ( जि. अहमदनगर ) - अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी अगस्ती कारखान्याची बदनामी केली तर फौजदारी दाखल करू असा इशारा दिला होता. त्यामुळे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांनी पत्रकार परिषद घेत सीताराम गायकर यांच्यावर टीका केली. ( Dashrath Sawant said, Sitaram Gaikar is the leader of earthworms ... )

या पत्रकार परिषदेत दशरथ सावंत, बी.जे.देशमुख, प्रल्हाद देशमुख, संदीप शेणकर उपस्थित होते. दशरथ सावंत म्हणाले, मागील विधानसभेत जनतेने 40 वर्षांची सत्ता उलथवून टाकली व आमदार लहामटे यांना आम्ही व जनतेने निवडून दिले मात्र शेतकरी व ऊस उत्पादक सभासदा सोबत राहण्याऐवजी पळपुटे धोरण स्वीकारणाऱ्या आमदाराचे पुढील विधानसभेत अनामत रक्कम जप्त होईल असा मला विश्वास आहे. अगस्ती कारखान्याच्या माध्यमातून गायकर यांनी आपली गांडूळ फळी निर्माण केल्याचा आरोप दशरथ सावंत यांनी केला.

Dashrath Sawant
दशरथ सावंत म्हणाले, साखर सम्राटांचे पुतळे उभे करून शेतकरी, कामगारांना दर्शन घेण्यास भाग पाडले जाते...

दशरथ सावंत पुढे म्हणाले की, अगस्ती कारखान्याच्या बाबत अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालक मंडळ जबाबदार आहे. गायकर यांनी त्यांचे हितसंबंध जोपासणारे लोक तयार केले आहेत. कारखान्याचे कर्ज आणताना कोणताही विधी निषेध पाळला नाही. कर्जातून आपल्या इस्टेटी वाढविल्या गेल्या गायकर हे बहुजनांचे नेते नाही तर गांडुळाचे नेते आहेत.

कारखान्याची भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आमदारांना बरोबर नेले मात्र आमदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष्य केले. त्यामुळे हा निकामी आमदार आहे. त्यांच्यासोबत एक माणूस फिरकत नाही, संघटन नाही. जनतेच्या प्रश्नांची जाण नाही. आपल्या भाषणात राया ठाकूर, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांची नावे घेऊन भाषणाला सुरवात करतात मात्र त्यांच्या प्रमाणे वागत नाही. राघोजी भांगरे हे तालुक्याचे मानबिंदू आहेत. या तालुक्यात कधीही आदिवासी बिगर आदिवासी असा भेद भाव झाला नाही.

Dashrath Sawant
शरीराने भाजपमध्ये पण मनाने राष्ट्रवादीतच होतो ः सीताराम गायकर

राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी 110 कोटी रुपये अर्थ संकल्पात मंजूर होऊन शेजारच्या तालुक्यात स्मारक होते. मात्र तालुक्याच्या आमदाराला काय चालले हे माहीत नाही. आमदार कशासाठी असतो हेच माहीत नाही. त्यामुळे या पुढील काळात अगस्ती कारखाना प्रशासन व आमदाराला सरळ करण्याचे काम करू असा इशाराच दशरथ सावंत यांनी दिला.

बी. जे. देशमुख म्हणाले, अकोले तालुक्यात अडीच लाख टन ऊस असून त्याची तोडणी बाहेरून ऊस तोडणी टोळी आणून करावी. गायकर सांगतात तशी अगस्ती कारखान्याची परिस्थिती नाही. कर्ज फेडण्यासाठी यांच्याकडे कोणतेही नियोजन नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढणार आहे, असा आरोप देशमुख यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com