Ajit Pawar Meet Shriniwas Patil: शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्यांची अजितदादांनी घेतली भेट; म्हणाले, 'लक्ष असुद्या...'

Satara NCP MP Shrinivas Patil : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेत अर्धा तास चर्चा केली.
Ajit Pawar and Shrinivas Patil
Ajit Pawar and Shrinivas PatilSarkarnama
Published on
Updated on

Satara News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेत जवळपास अर्धा तास चर्चा केली. या भेटीत खासदार पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत 'श्रीमान' हे पुस्तक भेट दिले. या भेटीनंतर अजित पवार थेट कोल्हापूरकडे रवाना झाले. रवाना होताना आगामी लोकसभेला इच्छुक असलेल्या सारंग पाटील यांना सारंग लक्ष असुद्या असे म्हटले. (DCM Ajit Pawar NCP MP Shrinivas Patil Meet )

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेतली. सकाळी बारामतीहून निघालेले अजितदादा दिवसभर सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. रात्री उशिरा कराड येथील लोकसेवा या निवासस्थानी खासदार पाटील यांच्या भेटीला दाखल झाले. खासदार पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे त्यांनी ही भेट घेतली. या भेटीवेळी अजित पवार गटाचे तालुकाप्रमुख जितेंद्र डुबल, राजेश पाटील-वाठारकर उपस्थित होते.   

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar and Shrinivas Patil
Maratha Reservation : '...तर सरकारला परिणाम भोगावे लागतील'; अधिसूचनेवरून आमदार शिंदे भडकले

अजितदादांच्या दौऱ्यात भेट अचानक ठरल्याने काही मोजक्याच लोकाची उपस्थिती होती. यावेळी श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र आणि आगामी लोकसभेला इच्छुक उमेदवार असलेले सारंग पाटील हे बाहेर होते. मात्र, अजित पवार घरी आल्याचे समजताच ते तातडीने निवासस्थानी दाखल झाले. यावेळी अजित पवार आणि खासदार पाटील यांनी जुन्या आठणींना उजाळा दिला. खासदार पाटील यांनी 'श्रीमान' पुस्तक लिहिलेले असून त्या पुस्तकाच्या आधारे दोन्ही कुटुंबातील आठवणी जाग्या केल्या. 

'काटेवाडीचे घर आबांनी बांधले'

काटेवाडी येथील घर जमीन घेवून 1925 साली बांधल्यांची आठवण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितली. तर खासदार श्रीनिवास पाटील यांना फेटा बांधण्यासाठी अजित पवार यांच्या आबांनी शिकवला असल्याची आठवण सांगितली. त्यावर अजित पवारांनी आबा गमतीशीर फेटा बांधत असत. मात्र, फेटा चांगला बांधायला शिकवत, असं सांगितलं.

कराडच्या ट्रॅफिकची अजित पवारांना धास्ती

कराड येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाहन चालकांना कायम ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ट्रॅफिक हटले का ? सूचना दिल्या असतील तर मग निघू, असे त्यांनी म्हटल्याने कराडच्या ट्रॅफिकची अजितदादांनीही धास्ती घेतल्याचे दिसून आले.

(Edited By-Ganesh Thombare)

Ajit Pawar and Shrinivas Patil
Maratha Reservation : '...त्यानंतर छगन भुजबळांचा गैरसमज दूर होईल' ; मुख्यमंत्री शिंदें विधान!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com