Maratha Reservation and Eknath Shinde News : 'मराठा समाजाबाबत काल जो अध्यादेश काढला आहे. त्यात सुस्पष्ट म्हंटले आहे की, पितृसत्ताक सगेसोयरे असा अर्थ असून त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केली होती त्यानुसार मराठावाड्यात दाखले मिळत नव्हते, ते आता मिळणार आहेत. कोणावरही अन्याय होणार नाही. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेची माहिती घेतल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल.' असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना म्हणाले, 'इतरांच्या हक्काला बाधा न पोहचता आम्हाला आरक्षण मिळावं ही जरांगे पाटील यांची मागणी होती. अधिसूचनेत सर्व बाबी स्पष्टपणे नमूद केल्या आहेत. ही अधिसूचना इतर समाजाला सुद्धा मार्गदर्शक ठरेल. छगन भुजबळ आमचे सहकारी आहेत. त्यांनी या अधिसूचनेची माहिती घेतल्यानंतर त्यांचाही याबाबतचा गैरसमज दूर होईल.' तसेच, मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर समाजाला धक्का न लावता टिकणारे आरक्षण देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदेयांनी यावेळी दिली. (Maratha Reservation and Eknath Shinde)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याशिवाय पुढे बोलताना शिंदे म्हणाले, 'शनिवारी मराठा आरक्षणाचा जो निर्णय घेतला, तो कुणबी नोंदी असताना प्रमाणपत्र मिळत नव्हती त्यांना प्रमाण पत्र मिळण्यासाठी होता. तर, नारायण राणेंनी केलेल्या विरोधाबाबत बोलताना 'ही अधिसूचना जुन्या कुणबी नोंदी ज्यांच्या आहेत त्यांच्यासाठी आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयावर मागासवर्गीय आयोग इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम ३६ जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास कसा आहे हे त्या डेटा मधून समोर येईल.' असं शिंदेंनी सांगितलं.
तसेच 'देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) असताना जे आरक्षण दिलं होतं त्यात काही त्रुटी राहिल्या होत्या का? याबाबत अहवाल तयार करण्याचेही काम सुरू आहे. त्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन टिकणार आरक्षण राज्यसरकार देणार आहे. यावेळी इतर कोणावर अन्याय होणार नाही. कुणबी आरक्षणाचा विषय वेगळा आहे आणि मराठा समाजाला टिकणार आरक्षण द्यायचा विषय वेगळा आहे. कुणीही गैरसमज करून घेऊ नये. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा निर्णय होण्यासाठी मागासवर्ग आयोग नेमला आहे.' अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
याचबरोबर 'मराठा समाजाने अनेकांना संधी दिली, मोठं केलं. मात्र त्यांनी संधीचं सोन केलं नाही. त्यावेळी मराठा समाजाला वंचित ठेवले. या सर्वेक्षणाच्या कामावर प्रश्न चिन्ह निर्माण करणे हीच त्यांची खरी वृत्ती दिसून येते. ते कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळा आणायचे काम करत आहेत. त्यामुळे सर्व पक्षांनी सर्वेक्षणाला सहकार्य करावे.' अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.