Maan News : खटाव,माणला दुष्काळ जाहीर करा; महाविकास आघाडीचा रास्ता रोको

Ranjitsinh Deshmukh अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
Mahavikas Aghadi Agitation
Mahavikas Aghadi Agitationsarkarnama
Published on
Updated on

-अय्याज मुल्ला

Maan News : खटाव-माण तालुक्याच्या शेती पाणी प्रश्नासह विविध समस्या व खटाव - माण तालुक्यांत दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आज येथे अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष, समविचारी पक्ष व महाविकास आघाडीच्यावतीने कातरखटाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे दोन तास झालेल्या या रास्ता रोकोमुळे मिरज - भिगवण मार्गावरील वाहतुक पुर्णत: ठप्प झाली होती.

अखिल भारतीय काँग्रेस Congress कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख Ranjitsinh Deshmukh यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आंदोलनात बाजार समितीचे उपसभापती विजय शिंदे, तालुकाध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, युवकचे जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे, शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, अंकुशराव दबडे, राजुभाई मुलाणी, परेश जाधव, मुबारक मुल्ला, जयकुमार बागल, सत्यवान कमाने, डॉ. महेश गुरव, सत्यवान कांबळे, संजीव साळुंखे, सुजाता महाजन, हणमंतराव भोसले, वैभव पाटील आदी सहभागी झाले होते.

कोण म्हणतंय देत न्हाय... घेतल्याशिवाय राहत न्हाय...; खटाव माण तालुक्यांत दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा... अशा घोषणांनी कातरखटाव परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी बोलताना श्री. देशमुख म्हणाले, खटाव व माण तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. बहुतांशी शेतक-यांच्या पेरण्या झालेल्या नाहीत, तर ज्यांनी पेरणी केली आहे.

त्यांची पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. पाण्यअभावी या दोन्ही तालुक्यांतील शेतकरी संकटात सापडला असताना याबाबत लोकप्रतीनिधींनी पावसाळी अधिवेशनात एकही शब्द काढला नाही. अशा परिस्थितीत सरकारला याची तीव्रता जाणून देण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. शासनाने याबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावा अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करू.

Mahavikas Aghadi Agitation
Prithviraj Chavan On Shinde : ''...म्हणून भाजपसाठी एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता संपलीय !'' ; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान

खटाव-माण तालुक्यांत दुष्काळ जाहिर करावा, उरमोडीचे पाणी त्वरीत सोडावे, खरीप हंगाम वाया गेल्याने त्याची नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करावे, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान त्वरीत मिळावे, टंचाईग्रस्त गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करावेत, जनावरासाठी चारा पाण्याची सोय करावी आदी मागण्यांचे निवेदन मंडलाधिकारी हिंमत बाबर यांना देण्यात आले.

यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तूकाका घार्गे, सुर्यभान जाधव, डॉ.गुरव, वैभव पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी मोहन देशमुख, प्रा. दिलीप डोईफोडे, राजेंद्र लोखंडे, अजय पाटील, मारुती दबडे, रविंद्र पाटील, अविनाश बागल, इम्रान बागवान, बापुराव देवकर, पोपट मोरे, राहुल सजगणे, निलेश घार्गे, सुरेश मंगरुळे, दिलीप बागल, अरविंद डोईफोडे, हणमंत घाडगे, अजय देवकर, पांडूरंग फडतरे, ॲड.प्रल्हाद सावंत आदी उपस्थित होते.

Mahavikas Aghadi Agitation
Satara News : सातारचे जिल्हाधिकारी ॲक्शनमोडवर; दरडग्रस्त गावांची केली पाहणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com