Maan Political News : माण, खटावला दुष्काळ जाहीर करा; जयकुमार गोरेंचे उपमुख्यमंत्री फडणवीसांना साकडे

Jaykumar Gore आमदार जयकुमार गोरे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन माण, खटाव तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
Jaykumar Gore, Devendra Fadanvis
Jaykumar Gore, Devendra FadanvisMLA Gores Twitter Account
Published on
Updated on

Maan Political News : पावसाळा संपला तरी माण, खटाव तालुक्यात सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही. बहुतांशी गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असताना महा मदत प्रणालीद्वारे केलेल्या सदोष सर्वेक्षणामुळे दोन्ही तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यात झाला नाही. दुष्काळी निकषांचे फेर सर्वेक्षण करून माण, खटावला दुष्काळाचा ट्रिगर टू लागू करावा, अशी मागणी आमदार जयकुमार गोरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांची भेट घेऊन माण, खटाव तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. आमदार गोरे म्हणाले, माण व खटाव हे दोन्ही तालुके दुष्काळी असून, यावर्षी या दोन्ही तालुक्यांत अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाली आहे.

माण तालुक्यात एकूण ११० महसुली गावे असून, या गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. तसेच खटाव तालुक्यातील १४० पैकी १३६ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. Maharashtra Political News

पावसाचा अनेक दिवस खंड पडल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. मतदारसंघातील दोन्ही तालुक्यांचे फेर सर्वेक्षण करून दोन तालुक्यांत दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. याबाबतचे पत्रही त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिले आहे.

Edited By : Umesh Bambare

Jaykumar Gore, Devendra Fadanvis
Satara Supriya Sule News : सुप्रिया सुळेंनी भरला महेश शिंदेंना दम; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केस कराल तर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com