Satara Supriya Sule News : सुप्रिया सुळेंनी भरला महेश शिंदेंना दम; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केस कराल तर...

Shashikant Shinde आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबवडे (ता. कोरेगाव) येथे आयोजित जाहीर सभेत खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या.
Mahesh Shinde, Supriya Sule
Mahesh Shinde, Supriya Sulesarkarnama
Published on
Updated on

Satara Supriya Sule News : महेश शिंदे आता सत्तेत आहे, पुढे दहा एक महिने राहतील. दहा महिनेपण खूप असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जरी कार्यकर्त्यावर चुकीची पाेलिस केस केली आणि ते माझ्या कानावर आले, तर गाठ माझ्याशी आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदेंना दम भरला.

आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांच्या वाढदिवसानिमित्त आंबवडे (ता. कोरेगाव) येथे आयोजित जाहीर सभेत खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule बोलत होत्या. खासदार सुप्रिया सुळे म्हणाले, शिंदे नावावर टीका करताना मला हात जरा आवरावा लागतो.

कारण माझ्या जन्मदातीचे नाव प्रतिभा शिंदे होते ते आता पवार झाले आहे. माझे आजोळचे आडनाव शिंदे आहे. ते इथले नाहीत घाटावरचे आहेत. आमदार शिंदे तेच आहे का, जे चुकीची भाषा अधिकाऱ्यांना वापरतात. तेच का हे महेश शिंदे असे त्यांनी विचारताच व्यासपीठावरून हो तेच असे सांगण्यात आले.

त्यावर खासदार सुळे म्हणाल्या, कोणताही लोकप्रतिनिधी सरकारी अधिकाऱ्यांबाबत वाईट बोलत असेल, तर ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. सातारकरांची तर नाहीच नाही. आता ते सत्तेत आहेत. पुढे दहा एक महिने राहतील. दहा महिने पण खूप महिने असतात.

Mahesh Shinde, Supriya Sule
Satara Supriya Sule News : खोके सरकारच्या काळात दारूची दुकाने वाढली : सुप्रिया सुळेंचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही कार्यकर्त्यावर चुकीची पाेलिस केस केली आणि ते माझ्या कानावर आले तर गाठ या सुप्रिया सुळेशी आहे, अशा शब्दांत त्यांनी महेश शिंदेंना दम भरला. आमच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करायच्या नाहीत. Maharashtra Political News

माझे फेसबुक पेज पाहा सर्वाधिक फोटो पोलिसांबरोबर असतील. माझ्या मतदारसंघात भानगडी नसतात. सत्तेत असलो नसतो तरी पोलिस यंत्रणेचा चुकीचा वापर आम्ही कधी केलेला नाही. कारण पोलिस कष्ट करून सेवेत येत असतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

Edited by : Umesh Bambare

Mahesh Shinde, Supriya Sule
NCP Crisis : मोठी बातमी ! जयंत पाटलांनी वाढवलं अजितदादांचं टेन्शन; 'ते' आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com