Karad : शिंदे-फडवणीस सभा समारंभात गुंतल्याने विकास रखडला : वळसे-पाटील

Dilip walse-Patil विजय दिवस समारोह समितीच्या कार्यक्रमासाठी आमदार वळसे-पाटील आज (गुरुवारी) कऱ्हाड (जि.सातारा) येथे आले होते.
Eknath Shinde, Dilip Walse Patil
Eknath Shinde, Dilip Walse Patilsarkarnama

कऱ्हाड : महाराष्ट्रातील सरकार अजुनही सभा-समारंभातच गुंतलेले आहे. त्यामुळे राज्यात विकास रखडला आहे. आम्ही या सरकारच्या कारभाराबद्दल अजिबात समाधानी नाही, अशी टीका शिंदे-फडणवीस सरकावर माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली. दरम्यान, महाविकास आघाडीच्या मोर्चाला राज्य शासनाने परवानगी दिली नाही तरी मोर्चा निघेलच, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विजय दिवस समारोह समितीच्या कार्यक्रमासाठी आमदार वळसे-पाटील आज (गुरुवारी) कऱ्हाड (जि.सातारा) येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील उपस्थित होते. वळसे-पाटील म्हणाले, अर्थसंकल्पात, जिल्हा नियोजन समितीतुन मंजुर झालेल्या कामांना 'स्टे' देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात विकास रखडला आहे. आम्ही राज्यातील सरकारच्या कारभाराबद्दल आम्ही समाधानी नाही.

महाविकास आघाडीच्या मोर्चाला सरकारने परवानगी द्यायला पाहिजे. हा मोर्चा सर्वसामान्य नागरीकांच्या प्रश्नासाठी आहे. परवानगी मिळो वा न मिळो मोर्चा हा निघणारचख, असे त्यांनी सांगितले. आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहासाठी राज्य सरकार एक समिती स्थापन करणार आहे, त्याबाबत ते म्हणाले, हा चुकीचा विचार आहे. राजकीय भुमिकेतुन लव्ह जिहादसारखा प्रश्न निर्माण करुन त्यामध्ये नवीन कायदा करण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. ते देशाच्या भारतीय राज्य घटनेच्या सुसंगत नाही. घटना अशा कोणत्याही गोष्टीला परवानगी देत नाहीत. समाजा-समाजात व्देष पसरवण्याचे काम होत आहे.

Eknath Shinde, Dilip Walse Patil
Koregaon : शशिकांत शिंदेंचा महेश शिंदेंवर निशाणा...रस्त्याचे काम थांबविण्यासाठी कुणी दबाव टाकला...

प्रत्येकाला घटनेने स्वातंत्र्य दिले आहे. त्याप्रमाणे या देशातील नागरीकांना वागण्याची परवानगी आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न हा सर्वोच्य उच्च न्यायालयात आहे. न्यायालय ठरवेल तोच निर्णय होईल. अनिल देशमुख यांच्यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रीया सुरु आहे. त्यामुळे त्यांना बाहेर येता आलेले नाही. उच्च न्यायालयाने निर्णय़ देवुन निर्णयांच्या अमंलबजावणीस दहा दिवसांचा 'स्टे' दिला आहे. दहा दिवसांची मुदत सर्वांनाच दिली जाते. दहा दिवसानंतर न्यायालयाच्या निर्णयानंतर ते आपल्यामध्ये येतील.

Eknath Shinde, Dilip Walse Patil
Marathwada : मोदींनी आधी सीमा प्रश्नावर भूमिका स्पष्ट करावी, मग समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ..

राज्यात इतिहास बदलण्याचे काम सुरु

महापुरुषांची केवळ बदनामी नाही तर इतिहास पुसण्याचे, इतिहास बदलण्याचे काम राज्यात सुरु आहे, अशी टीका राज्य सरकारवर करुन दिलीप वळसे -पाटील म्हणाले, महापुरुषांच्या बदनामी ही अजेंडा सेट करुन केली जात आहे. त्यातुन अशी वक्तव्य केली जात आहेत. त्यातुन इतिहास बदलण्याचे काम सुरु आहे.

Eknath Shinde, Dilip Walse Patil
Ajit Pawar : वंचित आघाडीसाठी तयार असल्यास मविआची भूमिका काय? अजित पवार म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com