सातारा पालिकेची विकास कामे सातारकरांसाठी की ठेकेदारांसाठी... शिवेंद्रसिंहराजेंचा टोला

खासदार उदयनराजेंच्या MP Udayanraje Bhosale सातारा पालिकेचे Satara palika कामकाज हे निवडणूक आयोगाच्या Election commission निर्णयावर Orders चालते का,'' असा प्रश्न शिवेंद्रसिंहराजेंनी Shivendraraje Bhosale उपस्थित केला आहे.
Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosalesarkarnama

सातारा : सातारा पालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की खासदार उदयनराजे भोसले यांनी विकास कामे तातडीने सुरू करा अशी सूचना केली आहे. मुळात हे रस्ते सातारकरांसाठी होतात की ठेकेदारांसाठी होत आहेत. येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी नगरसेवकांना फंड गोळा करण्यासाठी कामे होतात का, असा प्रश्न नगर विकास आघाडीचे नेते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, हद्दवाढीतील भागाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीची पालिकेने उधळपट्टी केल्या आम्ही राज्य सरकार किंवा संबंधित मंत्र्यांकडे तक्रार करू, अशा इशाराही त्यांनी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पालिकांच्या निवडणूका आहे त्या टप्प्यावरून पुढे सु्रू करण्याची सूचना केली आहे. त्यानंतर सातारा विकास आघाडीचे नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या नगरसेवकांची बैठक घेऊन विकास कामे तातडीने सुरू करा, अशी सूचना केली होती. या बैठकीवर व उदयनराजेंच्या भूमिकेवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कडाडून टीका केली आहे.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
माझ्या ताब्यात 'ईडी' द्या, दाखवतो सगळ्यांना... खासदार उदयनराजे

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ''ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सातारा पालिकेची निवडणूक स्थगित झाली आणि खासदार उदयनराजे गायब झाले. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने सातारा विकास आघाडीच्या नेत्यांनी बैठक घेऊन कामे तातडीने करा, अशी सूचना केली आहे. त्यामुळे खासदार उदयनराजेंच्या सातारा पालिकेचे कामकाज हे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर चालते का,'' असा प्रश्न शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केला आहे.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Video : सत्तेचा दुरूपयोग करणे चुकीचे : उदयनराजे

ते म्हणाले, ''निवडणूका आल्या की कामे करायची आणि निवडणूका गेल्या की कामे थांबवून ठेवायची असा प्रकार चालला आहे. साताऱ्यात पाणी कपात सुरू असून लोकांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. केवळ अर्धा तास पाणी येत आहे. कास धरणाच्या उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. पाच वर्षात सातारा विकास आघाडीचा नियोजन शुन्य कारभार सुरू असून कासची उंची वाढविल्यानंतर नवीन पाईपलाइन टाकून त्या माध्यमातून पाणी आणण्याचे कोणतेही नियोजन केलेले नाही.''

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
शिवेंद्रसिंहराजे म्हणतात, उदयनराजेंना माझं बोलणं झोंबलं....

''धरणाची उंची वाढली, क्षमता वाढली वाढीव पाणीसाठा झाला तरी सातारकरांना पालिकेच्या कारभारामुळे पुरेसे पाणी मिळणार नाही. हे सातारा पालिकेच्या नियोजन शुन्य कारभारचा नमुना आहे.'' खासदार उदयनराजेंनी रस्त्याची कामे सुरू करा, असे सांगितले आहे. पण, मे महिना संपत आलाय व पावसाळ्याच्या तोंडावर डांबरीकरण करा असे ते सांगत आहेत. नेमके सातारकरांसाठी रस्ते होतात की ठेकेदारांसाठी होत आहेत, असा प्रश्न करून ते म्हणाले, ''येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी नगरसेवकांना फंड गोळा करण्यासाठी कामे होतात का.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
शिवेंद्रसिंहराजे म्हणतात, सातारा पालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार

पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याची कामे करणार आणि हे काम निकृष्ट दर्जाची होणार आहेत. त्यामुळे ही कामे पावसाळ्यानंतर व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्य सरकारने पालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ठ भागासाठी निधी दिलेला आहे. या निधीचे योग्य नियोजन करून गरजेच्या ठिकाणी त्याचा वापर करावा, असे आम्ही मुख्याधिकाऱ्यांना सांगितले आहे. गरजेच्या ठिकाणचे रस्ते, गटर, स्ट्रीट लाईटसाठी गेला पाहिजे. निधीची उधळपट्टी झाल्यास त्याबद्दल आम्हाला राज्य सरकार किंवा मंत्र्यांकडे तक्रारी करावी लागेल.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हे न पटणारे; भाजप पालिका स्वबळावर लढणार 

केवळ टक्केवारी गोळा करणे, कमिशन आणि घंटागाड्याचे हप्ते यातीन विषयाकडे सातारा विकास आघाडीचे लक्ष आहे. पैसे गोळा करायचे हाच त्यांचा उद्योग आहे. सध्या घंटागाडीची टेंडर प्रक्रिया सुरू असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आपल्या मर्जितील ठेकेदार बसवायचे ठराविक पदाधिकाऱ्यांची माणसे त्यामध्ये बसवून केवळ पैसा मिळाला पाहिजे, असा त्यांचा उद्योग सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com