Lok sabha Election 2024 : फडणवीसांची आडम मास्तरांवर टीका; ‘त्यांनी कोणालाही पाठिंबा दिला तरी कामगार मोदींनाच मते देतील'

Devendra Fadnavis News : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. आडम यांचा त्या निर्णयाचा फडणवीस यांनी समाचार घेतला.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 16 April : सोलापूरमधील असंघटित कामगारांसाठी नरेंद्र मोदी यांनी पंधरा हजार घरे बांधली आहेत. मात्र, त्यांनी (असंघटीत कामगारांचे नेते माजी आमदार नरसय्या आडम) दुसऱ्यांना (काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे) पाठिंबा दिला आहे. त्यांनी कोणालाही पाठिंबा दिला, तर घरे कोणी दिली, हे कामगारांना माहिती आहे, त्यामुळे कामगार नरेंद्र मोदींनाच मते देतील, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार नरसय्या आडम यांच्यावर टीका केली.

सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनुक्रमे राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर विजय संकल्प रॅली काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या सभेत फडणवीस बोलत होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. आडम यांचा त्या निर्णयाचा फडणवीस यांनी समाचार घेतला.

ही निवडणूक ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभेची नाही, तर देशाचा पंतप्रधान निवडण्याची आहे. निंबाळकर-मोहिते पाटील अथवा सातपुते-शिंदे यांच्यातील ही लढाई नाही. ही लढाई राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी आहे. त्यामुळे विकासाच्या गाडीचे पॉवरफुल इंजिन असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनविण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

फडणवीस म्हणाले, मोदी हे देशाचा विकास करू शकतात. त्यांनी देशातील गरिबांसाठी विविध योजना राबविल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या पाठीशी कोट्यवधी लाभार्थींचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे एकत्र आलेले विरोधक त्यांच्या काहीही वाकडे करू शकणार नाहीत. त्यांनी देशातील भ्रष्टाचार संपवल्याने देशात विकास कामांना निधी मिळत आहे.

मोहिते पाटील, शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे एकत्र आले होते. त्याचाही फडणवीस यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, अनेक वर्षे त्यांनी नेतृत्व केले. पण दुष्काळी भागात पाणी पोचविण्यासाठी मोदींनाच यावे लागले. त्यांनी केवळ स्वप्न दाखवली. मात्र, ती स्वप्नं आम्ही प्रत्यक्षात साकार केली. (स्व.) गणतपराव देशमुख यांनी पाण्यासाठी प्रश्न फडणवीस यांच्या मदतीमुळे सुटू शकला असे म्हटले हेाते, त्याचाची उल्लेख फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com