अरे वेड्या, भाजपला गाडण्याची वल्गना करण्यापेक्षा आधी तुझं नाचगाणं बंद कर : फडणवीसांचा मुंडेंना टोला

भाजपविषयी अशी भाषा वापरताना आपण आपली पात्रता तपासावी.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : ‘‘भारतीय जनता पक्ष हा दोन खासदारांवरून तीनशे दोन खासदारांपर्यंत पोचलेला पक्ष आहे. इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भक्कमपणे वाटचाल करीत असलेला भाजप आहे. अरे वेड्या भाजपला महाराष्ट्राच्या मातीत गाडण्याच्या पोकळ वल्गना करणे बंद करून आपले सुरू असलेले नाचगाणे आधी बंद कर,’’ अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. (Devendra Fadnavis criticizes Social Justice Minister Dhananjay Munde)

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात फडणवीस बोलत होते. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बारामतीत दिवाळी पाडव्याच्या दिवशी भाजपला गाडण्याची भाषा केली होती. त्यापार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी हा पलटवार केला आहे. ते म्हणाले की, भाजपविषयी अशी भाषा वापरताना आपण आपली पात्रता तपासावी. त्यानंतर या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीत भाजपला गाडण्याचा विचार करावा. महाराष्ट्रात सध्या असलेले सरकार हालत नाही, डुलत नाही अन चालतही नाही. नेमके काय करते तर प्रत्येकांकडून वेगवेगळ्या माध्यमातून फक्त वसुली करण्याचे काम सुरू आहे.

Devendra Fadnavis
तुमच्यावर कसलेही संकट आले तर या भावाला एक हाक द्या : हसन मुश्रीफांचे आवाहन

शेतकरी, शेतमजूर व दलित बांधव या सर्वांच्या संकटात दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे आम्ही पाहत बसणार नाही, तर त्यांच्यासाठी अखंड संघर्ष करीत राहू असा विचारही फडणवीस यांनी मांडला. ते म्हणाले की, विरोधक हे दृढनिश्चयी नाहीत, ते पहिल्यांदा म्हणतात ही मोदींची लस आहे, आम्ही घेणार नाही. अरे ही लस भारताच्या शक्तीचे प्रतीक आहे आणि हे प्राणरक्षक आहे, असे वाटल्यावर नंतर सर्वांनी आपोआप लशीसाठी रांगा लावल्या.

Devendra Fadnavis
डॉ. अमोल कोल्हेंच्या पोस्टने खळबळ : राजकीय वाटचालीचे गूढ वाढले!

आता केवळ नऊ महिन्यांत 100 कोटी लशी दिल्या गेल्या आहेत, ही एक आपली मोठी ताकद दिसून आली आहे. या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या चुकांवर बोट ठेवत केंद्र सरकारच्या कामाचे कौतुक केले. जेव्हा जेव्हा ज्या गोष्टी व्हायच्या असतात, त्या होतच असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेनुसार योग्यवेळी त्या पूर्णत्वास जातील, असे शेवटी ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com