सोलापूर : दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्रातील नेतृत्व मजबूत होऊ लागल्यास त्याचे खच्चीकरण करण्याचा डाव नेहमीच खेळला जातो. कॉंग्रेस असो भाजप या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्रातील नेत्यांची नेहमीच मुस्कटदाबी केली आहे. यापूर्वी (कै.) यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad Pawar), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) आणि आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बाबतीत महाराष्ट्राने दिल्लीश्वरांच्या कुटील डावाचा अनुभव घेतला आहे, असा घाणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील (umesh Patil) यांनी केला आहे. (Devendra Fadnavis Deputy Chief Minister: NCP's Umesh Patil's allegations against Modi and Shah)
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांचे खच्चीकरण केले जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांचे पंख छाटले असल्याचा आरोपही उमेश पाटील यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकीय मुत्सद्देगिरी दाखवत होते. फडणवीस यांची राजकीय वाटचाल रोखण्यासाठीच त्यांना उपमुख्यमंत्री पदावर संधी दिली असावी, अशी शंकाही उमेश पाटील यांनी बोलून दाखवली.
देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता फडणवीस यांच्यामध्ये आहे. मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, अशी तमाम महाराष्ट्रीयन जनतेची इच्छा आहे. फडणवीस यांना दिल्लीतील भाजपच्या नेतृत्वाने जाणून-बुजून रोखल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना संधी देऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मूळ शिवसेना व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही संपविण्याचा डाव टाकला असल्याचेही प्रदेश प्रवक्ते पाटील यांनी स्पष्ट केले.
एका दगडात मारले तीन पक्षी
भाजप मराठा समाजाचा द्वेष करत नाही, भाजप मराठा समजातील नेतृत्वाला मुख्यमंत्री करू शकतो, हे भाजपने एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. भविष्यात पंतप्रधानपदाचा स्पर्धक महाराष्ट्रातून तयार होऊ नये; म्हणून मुख्यमंत्रीपदावर काम केलेल्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून मूळ शिवसेना व शिवसेनेवरील ठाकरे परिवाराचे वर्चस्व संपविण्याचा प्रयत्न भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केला असल्याचा आरोपही राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.