एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाची फडणवीसांना दोन दिवस आधीच माहिती होती!

पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांना दिल्लीत बोलावून घेतले होते. त्यांच्यासमोरच हा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Eknath Shinde -Devendra Fadnavis
Eknath Shinde -Devendra Fadnavis sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची घोषणा करून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अवघ्या महाराष्ट्राला धक्का दिला. मात्र, शिंदे यांना मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय दिल्लीत दोन दिवसांपूर्वीच झाला होता आणि त्याची कल्पना फडणवीस यांना होती, अशी माहिती आता पुढे येत आहे. मात्र, या गोष्टीची कोणालाही कुणकुण लागू देण्यात आली नव्हती. (Fadnavis knew about Eknath Shinde's Chief Ministership two days in advance!)

विधान परिषदेच्या मतदानानंतर राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाचे हादरे अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर तब्बल १० दिवसानंतर शांत झाले. बंडखोर नेते एकनाथ शिंदे हेही दहा दिवसांनंतर राज्यात परतले, ते थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले. त्याठिकाणी त्यांनी भाजप नेत्यांशी अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर फडणवीस, शिंदे आणि चंद्रकांत पाटील हे एकाच गाडीतून राजभवनावर दाखल झाले. त्या ठिकाणी सरकार स्थापनेचे पत्र राज्यपालांना दिले.

Eknath Shinde -Devendra Fadnavis
शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात या आमदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी?

राज्यपालांना पत्र देऊन माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी अख्खा राज्याला आश्चर्यचकीत करणारी घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आणि भाजपच्या अनेक नेत्यांचे चेहरे पत्रकार परिषदेतच खरर्कन उतरले. त्यावेळी फडणवीसांनी आपण नव्या सरकारमध्ये सामील होणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, अवघ्या अर्ध्या तासात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दूरचित्रवाणीवर येत फडणवीस यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी व्हावे, अशी सूचना केली. पाठोपाठ अमित शहांचेही ट्विट आले, त्यात त्यांनी राज्याच्या हितासाठी फडणवीस उपमुख्यमंत्री बनण्यास तयार झाले असे म्हटले होते. मात्र, फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले होते. पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयावर फडणवीस व त्यांचे समर्थक नाराज होते, हे उघड आहे.

Eknath Shinde -Devendra Fadnavis
शिरूरमधील दोघांपैकी कोणाला लागणार मंत्रीपदाची लॉटरी?

विशेषतः फडणवीस यांच्या नाराजीचीच राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. तत्पूर्वी फडणवीस यांनी शिंदे यांच्या नावाच्या केलेल्या घोषणेकडे काहीसे दुर्लक्ष झाले. चर्चा रंगली ती फडणवीस आणि त्यांचे उपमुख्यमंत्रीपद याचीच. मात्र, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय आधीच झाला होता, अशी माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्याचा निर्णय दिल्लीत दोन दिवसांपूर्वीच झाला होता. त्यासाठी पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांना दिल्लीत बोलावून घेतले होते. त्यांच्यासमोरच हा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, शिंदे यांच्या नावाच्या घोषणेने अख्खा राज्याला धक्का बसला असला तरी ते पूर्व नियोजित होते, हे आता उघड होऊ लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com