Satara News : कराड दक्षिणमधील हजारो शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! 'या' प्रकल्पाला उपमुख्यमंत्री फडणवीसांचा ग्रीन सिग्नल

Devendra Fadnavis On Karad Dakshin Vidhan Sabha Constituency : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेत कराड दक्षिणमधील हजारो शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे...
Devendra Fadnavis, Atul Bhosale
Devendra Fadnavis, Atul BhosaleSarkarnama
Published on
Updated on

विशाल वामनराव पाटील-

Karad Dakshin Vidhan Sabha : कराड दक्षिण मतदारसंघातील येवती- म्हासोली मध्यम प्रकल्पातून परिसरातील गावांसाठी वितरित केले जाणारे पाणी बंदिस्त पाइपलाइनद्वारे वितरित करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या बंदिस्त पाइपलाइन प्रकल्पामुळे शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होणार असून, सुमारे 4 हजार एकरहून जास्त क्षेत्र पूर्णत: ओलिताखाली येणार आहे. ग्रामस्थांच्या मागणीला आणि भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, महत्त्वाकांक्षी बंदिस्त पाइपलाइन प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. या बंदिस्त पाइपलाइन प्रकल्पामुळे ओंड, तुळसण, सवादे, म्हासोली, शेळकेवाडी यासह आसपासच्या परिसरातील गावांमधील शेतीला मुबलक पाणी उपलब्ध हाेणार असून, सुमारे 4000 एकरहून जास्त क्षेत्र पूर्णत: ओलिताखाली येणार आहे.

Devendra Fadnavis, Atul Bhosale
Pune Political News : रामराजेंच्या प्रयत्नांना यश; राजमाता सईबाई स्मृतीस्थळाच्या विकास आराखड्यास मान्यता

टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत 1994 मध्ये येवती– म्हासोली मध्यम प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या अंतर्गत दक्षिण मांड नदीच्या तिरावरील येवती येथील धरणातून डाव्या कालव्यातून पाण्याचे वितरण केले जाते. हा डावा कालवा आणि त्याच्या लघुवितरिका बहुतांश डोंगराळ भागातून जातात. शिवाय या कालव्याच्या कामाला सुमारे 30 वर्षे उलटल्याने अनेक ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होते. ज्यामुळे शेवटच्या गावापर्यंत पाणी पूर्ण क्षमतेने पोहोचत नाही. वास्तविक या धरणातून वर्षातून केवळ 2- 3 वेळाच पाणी सोडले जाते. त्यातही अनेक ठिकाणी पाणी पाझरते व त्याचा अपव्यय होत असल्याने पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध न झाल्याने या भागातील शेतीसमोर गंभीर संकट उभे राहते. अशावेळी धरणातून होणाऱ्या पाण्याचा पुरवठा बंदिस्त पाइपलाइनद्वारे केल्यास शेवटच्या ठिकाणापर्यंत पाणी थेट अपव्यव न होता पूर्ण क्षमतेने पोहोचू शकते. त्यामुळे या ठिकाणी बंदिस्त पाइपलाइन करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून ग्रामस्थांमधून होत होती.

गावातील ग्रामस्थांनी हा प्रश्न भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्याकडे मांडला असता, डॉ. भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, बंदिस्त पाइपलाइनसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली. या बंदिस्त पाइपलाइन प्रकल्पासाठी टेंभू उपसा सिंचन प्रकल्प कार्यालयाकडून सर्वेक्षण करण्यात आले असून, याबाबतचे सुमारे 32 कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निधीला मंजुरी मिळाल्यास हा प्रकल्प ताबडतोब साकारणे शक्य असून, यामुळे या भागातील सुमारे 4000 एकरहून अधिक जमीन पूर्णत: ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या कामास मंजुरी द्यावी, अशी मागणी डॉ. भोसले यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली. याची दखल घेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनास कार्यवाहीचे आदेश दिले असून, येत्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. डॉ. अतुल भोसले यांनी याप्रश्नी पाठपुरावा केल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे. ओंड, तुळसण, सवादे, म्हासोली, शेळकेवाडी यासह आसपासच्या गावांमधील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. याबद्दल या गावांमधील ग्रामस्थांनी डॉ. अतुल भोसले यांचे अभिनंदन करत, शासनाचे आभार मानले. ( Satara Politics News )

या वेळी ओंडचे माजी उपसरपंच भीमराव थोरात, भरत थोरात, कृष्णत थोरात, माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसो थोरात, ॲड. दीपक थोरात, अभिजित कोठावळे, राजेंद्र थोरात, व्ही. टी. थोरात, सुनील मोरे, सुनील जाधव, इंद्रजीत हणबर, दिलीप जाधव, आबासो सुतार, टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता आर. वाय. रेड्डीयार यांच्यासह विविध गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Devendra Fadnavis, Atul Bhosale
Maan Political News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी म्हसवडकरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com