Pune Political News : रामराजेंच्या प्रयत्नांना यश; राजमाता सईबाई स्मृतीस्थळाच्या विकास आराखड्यास मान्यता

Pune Collector या विकास आराखड्यांतर्गत कामांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून घेण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांची 'संनियंत्रण अधिकारी' म्हणून नियुती केली आहे.
Ajit Pawar, Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar, Ramraje Naik Nimbalkarsarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ऐतिहासिक राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या राजमाता सईबाई यांच्या स्मृतीस्थळाच्या विकास आराखड्यास शासनाच्या नियोजन विभागाकडून २९.७३ कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता मिळाली आहे. आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

फलटण राजघराण्यातील असलेल्या राजमाता सईबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या chhatrapati Shivaji Maharaj पत्नी व छत्रपती संभाजीराजेंच्या आई होत्या. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या राजमाता सईबाई यांच्या स्मृतीस्थळाच्या विकासासाठी विश्वस्त संस्थेकडून पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे Pune collector मागणी करण्यात आली होती.

पुणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने विकास आराखड्याचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. त्यास नियोजन विभागाकडून मान्यता देण्यात आली असून २९.७३ कोटींचा निधी आज मंजूर केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यास मंजूरी दिली आहे.

विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नाने हा निधी मंजूर झाला आहे.या विकास आराखड्यांतर्गत कामांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून घेण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांची 'संनियंत्रण अधिकारी' म्हणून नियुक्ती केली आहे.

Edited By : Umesh Bambare

Ajit Pawar, Ramraje Naik Nimbalkar
Satara News : राज्यात आंदोलनं का सुरू आहेत? माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मोठं कारण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com