Devendra Fadnavis and Udayanraje Bhosale : 'उदयनराजेंची बोगी मोदींच्या इंजिनला जोडा, म्हणजे...' ; फडणवीसांचं मतदारांना आवाहन!

Satara Lok Sabha Constituency : नरेंद्र मोदींची विकासाभिमुख ट्रेन मित्र पक्षांचे डबे घेऊन सुसाट वेगाने धावत आहे, असंही म्हणाले आहेत.
Devendra Fadnavis and Udayanraje Bhosale
Devendra Fadnavis and Udayanraje BhosaleSarkarnama

'विकासाच्या रेल्वेचे इंजिन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आहे. त्याला समाजातील सर्व घटकांचे वेगवेगळे डबे असून, सर्व जातीधर्माच्या लोकांना बसण्यासाठी त्या डब्यात जागा आहे. मात्र, विरोधी इंडिया आघाडीकडे सर्व इंजिनच असून, त्यांच्याकडे सर्वसामान्यांना बसण्यास डबेच नाहीत. खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावासमोरील कमळाचे बटन दाबल्यावर सातारा मतदारसंघाची बोगी थेट मोदी यांच्या इंजिनला जोडली जाऊन जिल्ह्याचा विकास सुरू होईल.', असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

विरोधकांच्या इंडिया आघाडीचा समाचार घेत फडणवीस म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांची 24 पक्षांच्या आघाडीची खिचडी आहे. 24 इंजिन एकमेकांचे पाय ओढत असल्याने ही ट्रेन जागेची हालतही नाही आणि डुलतही नाही. खासदार उदयनराजेंच्या(Udayanraje Bhosale) नावासमोरील कमळाचे बटण दाबल्यावर सातारा मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि विकास चालू होईल. नरेंद्र मोदींची विकासाभिमुख ट्रेन मित्र पक्षांचे डबे घेऊन सुसाट वेगाने धावत आहे.’’

तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचा वारसदार बहुमताने निवडून देऊन नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहनही त्यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis and Udayanraje Bhosale
Satara Loksabha : 'छत्रपतींच्या वंशजाविरोधात उमेदवार का दिला?' देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल

महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पाटणच्या बैल बाजार मैदानावर आयोजित सभेत फडणवीस(Devendra Fadnavis) बोलत होते. पालकमंत्री शंभूराज देसाई, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, रमेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, प्रदीप पाटील, भरत पाटील, भाजपच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कविता कचरे, नंदकुमार सुर्वे, अशोकराव पाटील, रामभाऊ लाहोटी, नाना सावंत, रामभाऊ डुबल आदी उपस्थित होते.

पाटण तालुक्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी व शासन खर्चाने शेती पाणीपुरवठा योजना करण्याची मागणी करून पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘‘भाजप व शिवसेना यांचा लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा पैरा ठरला असून, चार पिढ्यांची नाळ असणारा आमचा कार्यकर्ता विधानसभा निवडणुकीसारखा प्रयत्न करून उदयनराजे भोसले यांना निवडून आणतील.’’

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com