Satara Loksabha : 'छत्रपतींच्या वंशजाविरोधात उमेदवार का दिला?' देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल

Devendra Fadnavis : उदयनराजे भोसले म्हणाले, चार तारखेला लागणार निकाल यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. राजधानीतून अनेक चळवळींचा उगम झाला.
Devendra Fadnavis  Udayanraje Bhosale
Devendra Fadnavis Udayanraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

Political News: नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करताना साताऱ्याची शान व अभिमान असलेली खासदार उदयनराजे हे त्यांच्यासोबत दिसले पाहिजेत. कोल्हापूरात शाहू महाराजांना बिनविरोध द्यायला हवे होते, असे शरद पवार Sharad Pawar सांगत आहेत. मग, साताऱ्यात छत्रपतींच्या वंशजाविरोधात उमेदवार का दिला? किमान उदयनराजेंच्या तोडीचा तरी उमेदवार त्यांनी द्यायला हवा होता. ज्याने शौचालयात पैसे खाल्लेत असा उमेदवार शरद पवार यांनी दिला आहे. खासदार उदयनराजे त्यांच्या तुतारीची पिपाणी केल्याशिवाय थांबणार नाहीत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Devendra Fadnavis  Udayanraje Bhosale
Abhijeet Patil : पंढरपूरच्या विठ्ठल कारखान्यावर प्रथमच भाजप नेत्याची सभा; फडणवीसांसाठी अभिजित पाटलांचा पुढाकार

महायुतीचे सातारा लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांच्या प्रचारार्थ साताऱ्यातील तालीम संघाच्या मैदानावरील निर्धार सभेत फडणवीस बोलत होते. 'विराट सभा पाहून मनात कुठलीही शंका नाही. चार जूनला गुलाल उधळण्यासाठी यावेच लागेल. साताऱ्यात अजून एक सभा सुरु आहे. बाबांना विचारलं किती आहेत? या कोपऱ्यात बसलेत तेवढी सभा तिकडे सुरु आहे. आपल्याकडे मात्र मैदान भरुन सभा सुरु आहे.

साताऱ्यात आयटी पार्क, एमआयडीसी, वंदे भारत ट्रेन सुरु करण्याचा विषय असून या सगळ्या बाबींसाठी मोदीजींसोबत आपला प्रतिनिधी लागेल. आमच्या सोबत शिवेंद्रबाबा आहेत त्यांची एक किल्ली तुमच्याकडे आहे. दुसरी देशाची किल्ली मिळवायची असेल तर उदयनराजेंना दिल्लीला पाठवावे लागेल. आज आपला प्रतिनिधी नसताना दहा हजार कोटींची कामे साताऱ्यात आणली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उदयनराजे भोसले म्हणाले, चार तारखेला लागणार निकाल यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis उपस्थित आहेत. राजधानीतून अनेक चळवळींचा उगम झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५५ वर्षे काँग्रेसची सत्ता होती. जनतेने त्यांना भरभरुन मतदान त्यांना केलं. पण त्यांनी देशाकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले. पण गेल्या दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने परिवर्तन घडवलं.

विकास कामांचा डोंगर उभा राहिला. मोदींजींच्या माध्यमातून जिल्ह्यात दहा हजार कोटींची कामे मार्गी लावली. विकासाचा पर्व आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या माध्यमातून केवळ भूल थापा देण्याचे काम झाले आहे. मी सामान्य माणूस असून तुमची सुख, दु:ख ३२ वर्षे मी पाहिलेले आहेत. आता तुमचे सहकार्य अपेक्षित आहे, असे उदयनराजे भोसले म्हणाले आहे.

यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, महेश शिंदे, मकरंद पाटील, महादेव जानकर, मदन भोसले, नितीन पाटील, आदींसह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Edited By Roshan More)

Devendra Fadnavis  Udayanraje Bhosale
Raj Thackeray Konkan : उद्धव ठाकरे अन् नारायण राणे यांच्यात 'असा' फरक; राज ठाकरे नेमके काय म्हणाले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com