Shahjibapu Praised Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अलंकार; शहाजीबापूंकडून तोंडभरून कौतुक

फडणवीस यांनी नेतृत्वाची क्षमता संपूर्ण राज्याला दाखवून दिली आहे, त्यांनी विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काम केले आहे. त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राला आवडलेले आहे.
Devendra Fadnavis- Shahjibapu Patil
Devendra Fadnavis- Shahjibapu PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना कलंक म्हणून काय उपयोग आहे. गेल्या १५ वर्षांतील महाराष्ट्राच्या राजकारणातील फडणवीस हे अलंकार आहेत. एवढ्या कमी वयात एवढं प्रभावी नेतृत्व राज्याला देणं सोपं काम नाही, अशा शब्दांत सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. (Devendra Fadnavis is an ornament in Maharashtra politics : Shahajibapu Patil)

आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी नवे उमपुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचेही तोंडभरून कौतुक केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्याला नेतृत्वाची मोठी परंपरा आहे. फडणवीस यांनी नेतृत्वाची क्षमता संपूर्ण राज्याला दाखवून दिली आहे, त्यांनी विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काम केले आहे. त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राला आवडलेले आहे.

Devendra Fadnavis- Shahjibapu Patil
Maharashtra Politic's : सोन्याच्या पानाचा चहा...अन्‌ अजितदादांचे शिंदे-फडणवीसांसोबत चहाचे फुरके!

खासदार संजय राऊत हे जाणीवपूर्वक उलटसुलट विधानं करत असतात. अजित पवारांना अर्थमंत्रीपद द्यायचे नसेल तर मुख्यमंत्रीपद द्या, असा कोणताही निरोप भाजप हायकमांडने शिवसेनेला दिलेला नाही. संजय राऊत यांची खासदारकीची मुदत वर्षभर राहिली आहे, त्यांना आता कुठलाही पक्ष घेणार नाही, कारण त्यांना घेतले तर पक्ष फुटतो, हे लोकांना कळून चुकले आहे, असा टोमणा शहाजीबापूंनी राऊतांना लगावला.

Devendra Fadnavis- Shahjibapu Patil
Assembly Monsoon Session : विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाणार...? पण सत्ताधारी कूटनीती खेळणार?

अजितदादांनी माया केली तर सुप्रियाताई निवडून येतील...

अजित पवारांसोबत अनेक अनुभवी आमदार आले आहेत, ते मंत्री झाल्याने कारभाराला आणखी गती येईल. अजित पवार यांच्या येण्यामुळे शिवसेना-भाजप-रिपाइं युती आणखी भक्कम झाली आहे. महायुतीला निवडणुका सुकर झाल्या आहेत. विधानसभेला आम्ही २२५ च्या पुढे जागा जिंकू. लोकसभेला चुकून एखादी गेली तर नाही तर आम्ही ४८ पैकी ४८ जागा जिंकू. चुकून म्हणजं अजितदादांनी माया केली, तरच सुप्रिया सुळे या एकट्याच निवडून येतील. नाही तर आम्ही ४८ पैकी ४८ जागा नक्कीच जिंकू, असा दावाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com