Maharashtra Politic's : सोन्याच्या पानाचा चहा...अन्‌ अजितदादांचे शिंदे-फडणवीसांसोबत चहाचे फुरके!

मागच्या वर्षी तीनच महिन्यांत नुसत्या चहापानावर शिंदेंनी सव्वादोन ते अडीच कोटी रूपये मोजले! हे आकडे ऐकून, पाहून तेव्हाचे विरोधी नेते, आताचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले.
Assembly Session
Assembly Session Sarkarnama
Published on
Updated on

Assembly Session News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यात साऱ्यांचा पाहुणचार होतो...त्यात शिंदे कधीच मागे नसतात...मग त्यावर कितीही खर्च होऊ द्या, त्याची चर्चाही होऊ देत, पण आपले शिंदेसाहेब काय, हात आखडता घेत नाहीत... त्या मोकळेपणातूनच मागच्या वर्षी तीनच महिन्यांत नुसत्या चहापानावर शिंदेंनी सव्वादोन ते अडीच कोटी रूपये मोजले! हे आकडे ऐकून, पाहून तेव्हाचे विरोधी नेते, आताचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले आणि शिंदेंचाच शाब्दिक ‘पाहुणचार’ केला होता. (ही घटना पावसाळी अधिवेशाआधीची) (Ajit Pawar took tea with Eknath Shinde and Devendra Fadnavis)

खर्चाचे आकडे माध्यमांपुढं ठेवत, कपाळावर हात मारत अजितदादा मिश्किलपणे म्हणाले, ‘ही माणसं काय चहात सोन्याचं पान टाकतात की काय?' आता अजितदादांचा (Ajit Pawar) हा किस्सा मांडण्याचे कारण, शिंदे-फडणवीसांसोबत त्यांनी आज गरमागरमा चहाचे चार घोट घेतले. त्यावरूनच या चहात खरोखरीच सोन्याचे पान असते का? याची खमंग आणि तितकीच गरमागरमा चर्चा राजकीय वर्तुळात रंगली?

Assembly Session
Assembly Monsoon Session : विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाणार...? पण सत्ताधारी कूटनीती खेळणार?

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे उद्यापासून (ता. १७ जुलै) मुंबईत विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होतंय. रागावलेल्या विरोधी पक्षाने प्रथेप्रमाणे सरकारी चहापानावर बहिष्कार घातलेला. पण, अजितदादा मात्र त्याच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी (Devendra Fadnavis) चर्चा करत चहाचे फुरके घेत होते. ते चित्र पाहून दादांचे ते शब्द अनेकांना आठवले असतील.

Assembly Session
Ajit Pawar Meet Sharad Pawar : अजित पवारांचे मंत्री शरद पवारांच्या भेटीला; जयंत पाटील, आव्हाडांनाही बोलावले

मुख्यमंत्री शिंदे हे तसे कार्यकर्त्यांमध्ये रमणारे नेते....मुख्यमंत्री झाल्यानंतरही शिंदे हे कायम कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतात. वर्षा बंगल्यावरही कार्यकर्त्यांचा आणि नेतेमंडळींचा कायम राबता....आता कार्यकर्ते आणि पाहुणं म्हटलं की चहापान आलंचं. पण आपल्या मुख्यमंत्र्यांकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या चहानापासाठी अवघ्या तीन महिन्यांतच सव्वादोन ते अडीच कोटी रुपयांचा चुराडा झालेला. त्यावेळी विरोधात असलेले अजितदादा प्रचंड संतापले.

Assembly Session
Solapur Politic's : उद्धव ठाकरे अन्‌ काँग्रेससोबत अजितदादांना जायचंच नव्हतं; शिंदे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

चहानापावरील खर्च पाहून अजितदादांनी आपल्या खास शैलीत मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. ‘ही माणसं चहात काय सोन्याचं पान घालून देतात की काय’ असे ते आपल्या मोकळ्या ढोकळ्या स्वभावाप्रमाणे बोलून गेले. पण आपले मुख्यमंत्रीही रांगडे, त्यांनीही दादांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंलं. ‘होय, चहापानावर खर्च झालाय, कारण, माझ्याकडे सोन्यासाखी माणसं येतात,’ अशा शब्दांत दादांना फटकारलेलं.

Assembly Session
Vikhe Patil Warning : थोरातांच्या गावातून विखेंचा वाळूतस्करांना दणका; प्रवरेतील वाळूउपशाच्या चौकशीचा रोख कोणाकडे?

गेल्या अधिवेशनावेळी एकमेकांचा समाचार घेणारे हे दोन नेते आज मात्र एकत्र येऊन चहाचा आस्वाद घेत होते. आता त्या दोघांना एकत्र पाहून मागील अधिवेशनच्या वेळी दोघांमध्ये रंगलेला कलगीतुरा पटकन डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com