Devendra Fadnavis: 'डॅमेज कंट्रोल'साठी सोलापुरात गेलेले फडणवीस म्हणतात, 'देवाभाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नही बोलता...

Solapur BJP Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभेपासून धक्क्यावर धक्के दिलेल्या सोलापूर जिल्ह्यातील 'डॅमेज कंट्रोल'साठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचा प्रमुख चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहे.
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis NewsSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : महाविकास आघाडीकडून महायुतीला सत्तेतून खाली खेचण्यासाठी एकापेक्षा एक सरस डाव आखले जात आहेत.तर आघाडीला आव्हान परतवून लावण्यासाठी महायुतीकडूनही जोरदार तयारी केली जात आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींनी वेग पकडला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभेपासून धक्क्यावर धक्के दिलेल्या सोलापूर जिल्ह्यातील 'डॅमेज कंट्रोल'साठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचा प्रमुख चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मैदानात उतरले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भाजप आमदार समाधान आवताडे यांनी सोमवारी (ता.7) मेळाव्याचे आयोजन केले होते. याच मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी केली.

यावेळी ते म्हणाले, देवाभाऊ जो बोलता है वो करता है,और जो नही बोलता वो डेफिनेटली करता है अशी डायलॉगबाजी केली.या त्यांच्या डायलॉगला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.

'...अन् मी सरकार आणले!'

देवेंद्र फडणवीस म्हणाले,मंगळवेढा-पंढरपुर मतदारसंघातील पोटनिवडणुकांच्या प्रचारावेळी आपण येथे आलो होतो. त्यावेळी मी तुम्ही मला 1 आमदार द्या, 106 आमदार होऊ द्या, मी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो असं म्हटलं होतं. तुम्ही समाधान आवताडेंना आमदार केले,मी सरकार आणले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आपलं सरकार आलं,असंही फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवलं.

Devendra Fadnavis News
Anil Deshmukh : फडणवीस-देशमुख यांच्यातील वाद पुन्हा उफाळणार, नेमकं कारण काय?

राज्यातील महायुतीचं सरकार शेतकऱ्यांचं सरकार असून 1 रुपयात पीक विमा देत शेतकऱ्यांचा 8 हजार कोटींचा फायदा करुन दिला. तसेच राज्यात लाडकी बहीण, लेक लाडकी अशा योजना आणल्या.

तसेच,ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील लाडकी बहीण योजनेची रक्कम अॅडव्हान्समध्येच महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहितीही फडणवीसांनी या कार्यक्रमात दिली. यावेळी महिलांना एसटी बसमध्ये अर्ध्या तिकीटांमध्ये प्रवासाची सवलत दिल्यामुळे एसटी देखील फायद्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis Vs. Anil Deshmukh: फडणवीस यांच्यावर देशमुखांचे आरोप राजकीय, मुन्ना यादव यांनी सांगितली खरी परिस्थिती

फडणवीस म्हणाले, अनेकजण मला विचारतात, तुम्ही कुठुन पाणी आणलं, पण जिद्द असेल तर पाण्याचा थेंब थेंब वाचवून ते उपलब्ध केले. या भागातील 17 हजार हेक्टर जमिनीचा फायदा होत आहे. आमचं सरकार आल्यानंतर दुष्काळी पट्ट्यातील 24 गावांसाठी पाणी दिले. सातारा जिल्ह्यासह सांगोल्यात उपसा सिंचन योजनेतून 50 हजार हेक्टर जमिनीसाठी त्याचा फायदा झाल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com