Karad BJP News : धैर्यशील कदमांचे बाळासाहेब पाटलांना आव्हान... ते नेमके कोणत्या राष्ट्रवादीसोबत....

Dhairyashil Kadam भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्री. कदम यांनी कऱ्हाडचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Balasaheb Patil, Dhairyashil Kadam
Balasaheb Patil, Dhairyashil Kadamsarkarnama

-सचिन शिंदे

Karad BJP News : कऱ्हाड : कराड उत्तर मतदारसंघात कोणी निधी आणला यावरुन राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यात कलगीतूरा रंगला आहे. यातून धैर्यशील कदम यांनी आमदार पाटलांना आव्हान दिले आहे. आमदार पाटलांनी निधी कसा आणला तसेच ते नेमके कोणत्या राष्ट्रवादीसोबत हे स्पष्ट करावे. दोन्ही डगरीवर हात ठेऊ नये, असा आरोप श्री. कदम यांनी केला आहे.

भाजपच्या Satara BJP जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्री. कदम Dhairyashil kadam यांनी कऱ्हाडचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे भरत पाटील, मनोज घोरपडे, विक्रम पावसकर, रामकृष्ण वेताळ, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, महिला आघाडीच्या स्वाती पिसाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांना आव्हान दिले. ते म्हणाले, कऱ्हाड उत्तर मतदारसंघातील कामांसाठी आम्ही शिफारसी केल्या. सरकार आमचे आहे, त्यामुळे तो निधी आम्हीच खेचून आणला आहे. विरोधात असणाऱ्यांना निधी मिळत नाही, मग आमदार बाळासाहेब पाटील यांनी तो निधी कसा आणला ते त्यांनी स्पष्ट करावे.

पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही सक्षमपणे सांभाळणार आहोत. भाजप ज्या कोणाला विधानसभेची उमेदवारी देईल त्यांच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभे राहू असे स्पष्ट करून श्री. कदम म्हणाले, राज्यात व केंद्रात भाजपने जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. ते निर्णय जनतेपर्यंत पोचवण्याचे काम असणार आहे.

Balasaheb Patil, Dhairyashil Kadam
Satara BJP News : साताऱ्याचा खासदार, कऱ्हाड उत्तरचा आमदार भाजपचाच होणार... धैर्यशील कदम

स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून भाजप पक्ष जास्तीत जास्त वाढवा यासाठी प्रयत्न करणारे जिल्ह्यातील ज्येष्ठांसह तरुणांचा मेळ घालत व त्यांना बरोबर घेत आपण पक्ष वाढवणार आहे. येणारे वर्ष निवडणुकांचे वर्ष असणार आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचून सहकाऱ्यांसमवेत भाजप पक्ष जिल्ह्यात एक नंबर करण्याचे प्रयत्न करणार आहोत.

भाजप सशक्त आहेच मात्र तो अधिक सशक्त व मजबूत कसा होईल यासाठी प्रयत्न असणार आहेत. पक्ष वाढवताना बुथ सक्षमीकरण करण्याचे प्रयत्न असणार आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी संपर्क कार्यालय ठीक ठिकाणी उभारणार आहे. प्रत्येक सोमवारी जनतेचे प्रश्न मिटवण्यासाठी जनता दरबार घेणार आहे. त्याचेही नियोजन झाले आहे.

Balasaheb Patil, Dhairyashil Kadam
MIDCसाठी Rohit Pawar आक्रमक, विधानभवनातील छत्रपतींच्या मूर्तीजवळ आंदोलन | NCP|Karjat-Jamkhed | MIDC

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com