Satara BJP News : साताऱ्याचा खासदार, कऱ्हाड उत्तरचा आमदार भाजपचाच होणार... धैर्यशील कदम

Dhairyashil Kadam पुसेसावळी (ता. खटाव) येथील दत्त मंगल कार्यालय येथे मोदी@9 व महाजनसंपर्क अभियानांतर्गत भव्य लाभार्थी मेळाव्या प्रसंगी धैर्यशील कदम बोलत होते.
Dhairyashil Kadam
Dhairyashil Kadamsarkarnama
Published on
Updated on

Khatav BJP News : कऱ्हाड उत्तर मतदारसंघाबरोबर सातारा जिल्ह्यातील जनता सत्ताधारी व नुसत्या राजकारणी नेत्यांना पुरती वैतागली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातील सर्व निवडणूका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली लढून साताऱ्याचा खासदार आणि कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा भाजपचाच होणार असल्याचे मत वर्धन अॅग्रोचे अध्‍यक्ष व भाजपचे नेते धैर्यशील कदम यांनी व्यक्त केले.

पुसेसावळी (ता. खटाव) येथील दत्त मंगल कार्यालय येथे मोदी@9 व महाजनसंपर्क अभियानांतर्गत भव्य लाभार्थी मेळाव्या प्रसंगी धैर्यशील कदम Dhairyashil Kadam बोलत होते. या वेळी खटाव- माण साखर कारखान्याचे को-अध्यक्ष मनोज घोरपडे Manoj Ghorpade, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ, भाजप कऱ्हाड उत्तर अध्यक्ष महेश जाधव, सुरेश पाटील, महेंद्र कुमार डुबल, विक्रमशील कदम, शंकरराव शेजवळ, दीपाली खोत, उपस्थित होते.

मनोज घोरपडे म्हणाले, ‘‘येत्या काळात सातारा जिल्ह्याची ओळख राजकीयदृष्ट्या बदलेल, विकासाच्या नव्या वाटा भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून जिल्ह्याला दाखवेल.’’ या वेळी रामकृष्ण वेताळ, महेश जाधव, सुरेश पाटील आदींची भाषणे झाली. या मेळाव्या प्रसंगी महाराष्ट्र कामगार महामंडळाच्या लाभार्थ्यांना पेट्यांचे वाटप करण्यात आले.

Dhairyashil Kadam
Satara News : संभाजी भिडेंच्या सभेस परवानगी देऊ नये : परिवर्तनवादी संघटनांची मागणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com