महाडिकांचा दुसरा घाव 'गोकूळ'वर; पाटलांकडून एक-एक किल्ला पुन्हा ताब्यात घेण्याचा चंग

Satej Patil | Dhananjay Mahadik | सत्ता नसताना आमच्यापासून ज्यांनी फारकत घेतली होती, ते आता संपर्क करत आहेत
Dhananjay Mahadik Latest Marathi News, Satej Patil Latest Marathi News, Kolhapur News
Dhananjay Mahadik Latest Marathi News, Satej Patil Latest Marathi News, Kolhapur News Sarkarnama

कोल्हापूर : सत्तांतराचे गोकुळ आणि जिल्हा बँकेतही परिणाम दिसतील. आमच्यापासून ज्यांनी फारकत घेतली ते आता पुन्हा संपर्क करत आहेत, असे सांगत खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी कोल्हापूरच्या (Kolhapur) राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे आता खासदार महाडिक राज्यसभेनंतर दुसरा घाव सतेज पाटलांच्या (Satej Patil) गोकूळ दूध संघावर घालणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, लोकसभेला माझा पराभव झाला. विधानसभेला अमल महाडिक पराभूत झाले. विधान परिषदही आम्हाला सोडावी लागली. गोकुळ आमच्या ताब्यातून गेले. तेव्हा आम्हीच सगळे आहोत, आम्हालाच सगळे मिळणार, असा काहींचा समज होता. आता महाडिक राजकारणातूनच संपले, बाहेर फेकले गेले, आता त्यांना कधीच गुलाल लागणार नाही, अशाही वल्गना करण्यात आल्या.

पण, महाडिकांनी रणांगण सोडले नव्हते. भाजप आणि चंद्रकांत पाटील यांनी संधी दिली. यानंतर आपल्याला गुलाल लागल्याचे सगळ्यांनी बघितले आहे. रणांगणात आणखी ताकदीने लढू असे यापूर्वीही आपण म्हणालो होतोच. जोडीला आता राज्यात सत्ता बदल झाला आहे. भाजप आणि नव्या शिवसेनेचे सरकार आले आहे. या सत्ताबदलाचा परिणाम गोकुळ आणि जिल्हा बँकेवरही होईल. कारण सत्ता नसताना आमच्यापासून ज्यांनी फारकत घेतली होती, ते आता संपर्क करत आहेत, असे सांगत महाडिक यांनी गोकूळमध्ये सत्तांतर होणार असल्याचा अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.

धनंजय महाडिक पुढे म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह महापालिका निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षाचे अधिक उमेदवार विजयी होतील, चांगले यश मिळेल यासाठी आता तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीचे विरोधक, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनीही यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. आपल्याशीही त्यांची चर्चा झाली आहे. त्याचा तपशील आपण सांगू शकणार नाही. मात्र, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकीत त्यांच्याशी आपली आघाडी होऊ शकते. आपण त्यासाठी इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाडिक गटाची सत्ता येणार?

राज्यातील सत्तांतरानंतर गोकूळमध्ये सतेज पाटील यांच्या गटासोबत असलेले आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर आणि आमदार विनय कोरे हे सर्व पुन्हा महाडिक गटासोबत येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आबिटकर गटाचे २, नरके गटाचे २, कोरे गटाचे २ मिणचेकर आणि पी. एन. पाटील गटाचे संचालक आपलं मत महाडिक गटाच्या बाजूने देवू शकतात. या नव्या संख्याबळानुसार पाटील गटाला शह बसू शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com