Solapur Politic's : पवारांचा आमदार अन्‌ अजितदादांच्या निकटवर्तीयामध्ये विधीमंडळाच्या गॅलरीत गुफ्तगू; दोघांत काय चर्चा रंगली?

Umesh Patil Meet Abhijeet Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हेही सध्या मुंबईत असून आज त्यांनी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली.
Umesh Patil-Abhijeet Patil
Umesh Patil-Abhijeet PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 01 July : मराठी भाषेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येत असताना दोन्ही पवार कधी एकत्र येणार?, याची उत्सुकता वाढली आहे. दोन्ही पवारांचे पक्ष वेगवेगळे असले तरी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आजही सुसंवाद असल्याचे दिसून येते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्यात आज विधान भवनाच्या गॅलरीत चांगलीच चर्चा रंगली होती. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा सुरू होती, दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाबाबत चर्चा झाली का, याची उत्सुकता सोलापूरकरांना आहे.

मुंबई सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या निमित्ताने राज्यभरातील नेतेमंडळी, आमदार, मंत्री आणि पदाधिकारी हे विविध कामाच्या निमित्ताने मुंबईत तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील (Umesh Patil) हेही सध्या मुंबईत असून आज त्यांनी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील या दोन नेत्यांमध्ये बराच वेळ विधिमंडळाच्या आवारात चर्चा सुरू होती, त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत चर्चा झाली का. सत्ताधारी राष्ट्रवादीकडे जाण्याबाबत सोलापुरातील आमदारांनी मांडलेल्या भूमिकेचे काय झाले, याची उत्सुकता सोलापूरकरांना आहे.

अभिजीत पाटील (Abhijeet Patil) हे उमेश पाटील यांच्या कानात काहीतरी सांगत असल्याचे दिसून येत आहे. उमेश पाटीलही अभिजीतआबांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेत असल्याचे दिसून येत आहे. उमेश पाटील यांचा पक्ष सत्ताधारी असल्याने निधीच्या संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली की इतर विषयांवर चर्चा झाली, याबाबत उत्सुकता आहे.

Umesh Patil-Abhijeet Patil
Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंनी तुपेंना कोंडीत पकडले; ‘ही संधी पुन्हा नाही...सचिवांना बांधून आणण्याची परवानगी द्या अन्‌ तुमचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहून घ्या’

उमेश पाटलांच्या दाव्याला बळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर उमेश पाटील हे प्रथमच मोहोळमध्ये आले होते. त्या वेळी मोहोळमधील सत्कार समारंभानंतर बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे चार आमदार आमच्यासोबत आहेत, असा दावा केला होता. त्यानंतर उमेश पाटील आणि अभिजीत पाटील यांच्यात मुंबईत भेट होऊन चर्चा झाल्याने पाटलांच्या दाव्यांना बळकटी मिळत आहे.

अभिजीत पाटलांची पवारांकडे विनंती

दरम्यान, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनीही दोन दिवसांपूर्वी कबुली दिली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र यावे, अशी भावना व्यक्त केली होती. तसेच, शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी दोन्ही पवारांनी एकत्र यावे, अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र येणार, याची उत्सुकता आहे.

Umesh Patil-Abhijeet Patil
Vishwajeet Kadam : पटोलेंना निलंबित करताच विश्वजित कदमांनी भाजपचा विरोधात असतानाच इतिहासच काढला; निलंबनाचे कारणही सांगितले

महत्त्वपूर्ण भेट

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याची भाषा करत असतानाच तेच अभिजीत पाटील आणि उमेश पाटील यांच्यात विधीमंडळाच्या आवारात झालेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com