Nitin Gadkari : कराड उत्तरेतील घराणेशाही मोडीत काढा...नितीन गडकरी

Dhairyashil Kadam कराड उत्तर भाजपाचे नेते धैर्यशील कदम व शिष्ट मंडळाने केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी यांची फलटणमध्ये भेट घेतली.
Nitin Gadkari, Dhairyashil Kadam
Nitin Gadkari, Dhairyashil Kadamsarkarnama

Phaltan News : कराड उत्तरमध्ये Karad North चालत आलेली घराणेशाही येणाऱ्या निवडणुकीत मोडून काढण्यासाठी आत्तापासून कामाला लागावे. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे BJP सरकार आहे. त्यामुळे कराड उत्तरच्या विकास कामासाठी लागणाऱ्या निधीची काळजी करू नये. विकास कामासाठी जेवढा निधी लागेल तो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी दिले.

कराड उत्तर भाजपाचे नेते धैर्यशील कदम व शिष्ट मंडळाने केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी यांची फलटणमध्ये भेट घेतली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार राहुल कुल, शहाजीबापू पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास उपस्थित होते. यावेळी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांवर व विकास कामांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी गडकरी म्हणाले, कराड उत्तरमध्ये चालत आलेली घराणेशाही येणाऱ्या निवडणुकीत मोडून काढण्यासाठी आत्तापासून कामाला लागावे. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे कराड उत्तर च्या विकास कामासाठी लागणाऱ्या निधीची काळजी करू नये. विकास कामासाठी जेवढा निधी लागेल तो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिला जाईल. धैर्यशील कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्षवाढीसाठी काम करावे, विकास निधीची चिंता करू नका.

Nitin Gadkari, Dhairyashil Kadam
Nitin Gadkari News : गडकरींनी धमकी देणाऱ्या गुंडाची ती डायरी पोलिसांच्या हाती ; आणखी काही जणांना धमकीचे फोन..

यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः हून धैर्यशील कदम यांच्याकडून वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडची माहिती घेतली. साखर कारखानदारी व गुळ पावडर तयार करणाऱ्या साखर कारखान्यांमध्ये वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग कारखाना हा प्रथमस्थानी असून हा देशातील साखर कारखानदारीला फार मोठा दिशादर्शक असा उद्योग आहे, असे सुचोवात गडकरी यांनी केले. लवकरच मी वर्धन कारखान्याला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Nitin Gadkari, Dhairyashil Kadam
Phaltan : आळंदी-पंढरपूर पालखी मार्ग तीन महिन्यात पूर्ण करणार : मंत्री गडकरी

यावेळी ओगलेवाडी, शामगाव, पुसेसावळी, वडूज, दहिवडी, शिखर शिंगणापूर, नातेपुते हा शंभर किलोमीटरचा रस्ता सध्या राज्यमार्ग आहे. तो राष्ट्रीय महामार्ग बनवून चौपदरीकरणासाठी निधी मंजूर करण्याची तसेच मल्हारपेठ, उंब्रज, मसूर, रायगाव, चोराडे, म्हासुर्णे, मायणी, पंढरपूर या राज्य मार्गासाठी निधीची मागणी धैर्यशील कदम यांनी निवेदनाद्वारे केली.

Nitin Gadkari, Dhairyashil Kadam
Satara : रम्मी खेळण्यासाठी तो चक्क बॅटऱ्या चोरायचा; पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com