संपर्क प्रमुख कोरगावकरांवर शिवसैनिकांची पुन्हा नाराजी जाहीर : आदित्य ठाकरेंकडे केली तक्रार

युवा शिवसैनिकांनी नेते आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांच्याकडेच भाऊ कोरगावकरांची तक्रार केली आहे.
Shivsena
Shivsena Sarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे संपर्क प्रमुख म्हणून भाऊ कोरगावकर हे काम पाहत आहेत. मात्र त्यांच्या विरोधात नेहमीच शिवसैनिकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. आता तर चक्क युवा शिवसैनिकांनी नेते आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांच्याकडेच भाऊ कोरगावकरांची तक्रार केली आहे. त्यामुळे भाऊ कोरगावकरांची गच्छंती होणार, अशी चर्चा नगर शहरात सुरू आहे. ( Displeasure of Shiv Sainiks on contact chief Korgaonkar declared again: Complaint to Aditya Thackeray )

अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या बरोबर जाऊन शिवसेनेने सत्ता स्थापन केली. तेव्हापासून कोरगावकरांबाबत जाहीर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. एका नगरसेविकेच्या नातेवाईकाने तर कोरगावकरांना धक्काबुक्कीही केली होती. त्यानंतर कोरगावकरांविरोधातील नाराजी जाहीरपणे शिवसैनिक व्यक्त करू लागले.

Shivsena
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे मोदींच्या रडारवर; सरकारनं उचललं मोठं पाऊल

तीन दिवसांपूर्वी शिवसेनेचे अहमदनगर दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही युवासेनेचे जिल्हा प्रमुख विक्रम राठोड यांनी कोरगावकरांबाबत नाराजी व्यक्त केली होती. कोरगावकर शिवसेना संपवित असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Shivsena
संजय राऊतांच्या घरातच शिवसेना फुटली? भाऊ सुनिल राऊत गुवाहटीला जाण्याच्या तयारीत...

शिवसंपर्क यात्रे निमित्त जेव्हा आदित्य ठाकरे हे शिर्डीत आले त्यावेळी त्यांनी विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे, उपशहर प्रमुख गिरीश जाधव, अशोक दहिफळे, नगर शहर, नगर तालुका व श्रीगोंदे तालुक्यातील शिवसैनिकांशी चर्चा केली. या चर्चे त्यांनी कोरगावकर हे नगर शहरात शिवसेना संपवित असल्याचा आरोप केला. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी कोरगावकरांसंदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यात कोरगावकरांवर कारवाई होणार अशा स्वरूपाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com