Pandharpur News : ठाकरे गटाच्या जिल्ह्याध्यक्षांची तरूणाला जबर मारहाण; 'मुख्यंमंत्र्यांसमोरच पेटवून घेण्याचा इशारा..'

Pandharpur News : "शिंदे यांच्यावर 307 कलमानुसार गुन्हा दाखल करा.."
Sambhaji Shinde
Sambhaji ShindeSarkarnama

Pandharpur News : शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्ह्याध्यक्षांनी एका तरूणाल बेदम मारहाण केल्याची घटना घडून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याच गावातील गणेश ताड या तरूणाला केबल वायरने जबर मारहाण केली आहे.

यानंतर आता संबंधित तरूणाने शिंदे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा २६ ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर येतील, त्यावेळी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

Sambhaji Shinde
Ashutosh Kale v/s Vivek Kolhe ; कोपरगावमध्ये कोल्हे -काळे वाद पुन्हा चव्हाट्यावर | NCP | Sarkarnama

गणेश ताड या तरूणाला केबल वायरने बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर पंढरपूरच्या ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गंभीर मारहाण करूनही शिंदे यांच्यावर योग्य कलमांनुसार कारवाई केली नसल्याचे, तरूणाने म्हंटले आहे. शिंदे यांच्यावर 307 कलमानुसार गुन्हा दाखल करा, अन्यथा येत्या 26 आॅगस्टला मुख्यमंत्री पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत, त्यावेळी त्यांच्याच समोर आत्मदहन करू, असा इशारा मारहाण झालेल्या गणेश ताड यांनी दिला आहे.

Sambhaji Shinde
Sharad Pawar Rally In Beed : कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या.. ; शरद पवारांची तोफ धडाडण्यापूर्वीच मुंडे समर्थकांकडून बॅनरबाजी

दोन दिवसांपूर्वी ठाकरे गट शिवसेनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष संभाजी शिंदे व इतर चार जणांनी गणेश ताड या तरूणाला उचलून नेले व केबल वायरने बेदम मारहाण करून डोक्यात लोखंडी रॉडने मारहाणी केली. या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पण राजकीय दबाव आणून प्रकरण दडपण टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप, गणेश ताड यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com