Kolhapur NCP Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी केली आघाडीची पंचाईत, विधानसभेला 'या' मतदार संघावर केले दावे !

Mahavikas Aaghadi Loksabha Election : कागल, चंदगड आणि राधानगरी-भुदरगड हे तिन्ही मतदारसंघ पारंपारिक 25 वर्षापासून राष्ट्रवादीकडे आहेत. आता उरलेल्या सात मतदारसंघापैकी दोन मतदारसंघ हे राष्ट्रवादीला मिळावेत..
Kolhapur Mahavikas Aaghdi
Kolhapur Mahavikas AaghdiSarkarnama

Kolhapur News : कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून स्वतःची उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता असताना आता महाविकास आघाडीत देखील तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे महाविकास आघाडीतील जिल्ह्यातील नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. जिल्ह्यातील तीन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून या मतदारसंघावर विजय मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

कोल्हापूर जिल्हा ग्रामीण आणि कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शिवाजी स्टेडियम येथील राष्ट्रवादी कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रास्ताविक व स्वागत शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी केले यावेळी 8 खासदारांचे अभिनंदन करण्याबरोबरच पक्षाध्यक्ष शरदचंद्रजी पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही संघटन कौशल्याबद्दल आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेचे आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांनी आता विधानसभेचे वेध लागले असून कोल्हापूर जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादीकडे असून या तीनही मतदारसंघांमध्ये शरदचंद्र पवार (Sharad Pawar) जो उमेदवार देतील तो निवडून आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले. कागल, चंदगड आणि राधानगरी-भुदरगड हे तिन्ही मतदारसंघ पारंपारिक 25 वर्षापासून राष्ट्रवादीकडे आहेतच उरलेल्या सात मतदारसंघापैकी दोन मतदारसंघ हे राष्ट्रवादीला मिळावेत अशी मागणी आहे.

राजू शेट्टीनी ऐकलं असतं तर..

महाविकास आघाडीने सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी दिली आणि वीस दिवसात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. अगदी थोडक्या मतांनी पराभव पत्करावा लागला. परंतु हा विजय महायुतीचा नसून हा पैशाचा आहे. राजू शेट्टीने ऐकलं असतं तर कोल्हापूर जिल्ह्याच्या ठरल्याप्रमाणे दोन्ही जागा महाविकास आघाडीला मिळाल्या असत्या, असेही व्ही.बी.पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com