Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Eknath Shinde Village : मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावातील निवासस्थानाबाहेर दिव्यांगांचे आंदोलन

Divyang Protest at CM Town in Satara: दिव्यांगांच्या विविध मागण्यांचे वारंवार निवेदने देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत थेट मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरच आंदोलन छेडले

Satara Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभरातील सभांमध्ये हे सरकार सर्वसामान्य लोकांचे आहे. मी मुख्यमंत्री झालो असलो तरी लोकांत मिसळून कार्यकर्त्याप्रमाणेच काम करतो, असा दावा करत असतात. मात्र सातारा जिल्ह्यातील मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावातील निवासस्थानाबाहेर जिल्ह्यातील दिव्यांगांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनी दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा करुन निवेदने दिली आहेत. मात्र त्यांच्या या मागण्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी अखेर मुख्यमंत्र्यांच्या दरे या मूळगावी जाऊन तेथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात अजय पवार यांच्यासमवेत नामदेव इंगळे, लतिका जगताप, अक्षय बाबर, पांडुरंग शेलार, सतीश जाधव, शैलेंद्र बोर्डे हेही सहभागी झाले आहेत. (Lates Political News)

Eknath Shinde
Devendra Fadnavis : स्वप्न बाळासाहेबांचे, पूर्ण केले अमित शाहांनी; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

याबाबत अजय पवार यांनी दिलेल्या निवेदनात केल्या मागण्यांमध्ये जिल्ह्यातील दिव्यांगांचा अनुशेष भरुन काढावा. दिव्यांग, निराधार, विधवायांना पाच हजार रुपये पेन्शन द्यावी. प्रत्येक जिल्ह्यात दर महिन्याला पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगांचा जनता दरबार घ्यावा, आदी मागण्या केल्या आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे.

जिल्ह्यात दिव्यांग भवनासाठी पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जागा व निधीची उपलब्धता करावी. तसेच शासन निर्णयानुसार दोनशे स्क्वेअर फूट जागा व्यवसायासाठी देण्याबाबतच्या प्रस्तावाला लवकर मंजूरी द्यावीत. गणेश दुबळे हे प्राथमिक शिक्षक असून ते बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच सातारा (Satara) पालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांच्यावर कधी कारवाई होणार तसेच आमची संस्था सहा वर्षे काम करत असताना 150 फुटावर दुसऱ्या संस्थेस कशी जागा दिली, याबद्दल पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यावर कारवाई करावी, आदी मागण्याही करण्यात आलेल्या आहेत.

मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या गावातील निवासस्थानाबाहेरच दिव्यांगानी उपोषण सुरू केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. उपोषण सुरू झाल्यानंतर प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे. आता यावर प्रशासन काय तोडगा काढते आणि मुख्यमंत्री शिंदे काय आदेश देणार याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Eknath Shinde
Deepak Kesarkar News : रश्मी ठाकरे अन् आदित्य ठाकरे हे पंतप्रधान मोदींना भेटले; केसरकरांचा खळबळजनक दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com