Phaltan Hospital : माजी आरोग्य मंत्र्यांच्या OSDने धमकावलेल्या डॉक्टराचा मृत्यू; फलटणचे वैद्यकीय अधीक्षक निलंबित, अवघ्या 10 महिन्यांत 2 डॉक्टरांची आत्महत्या

Dr. Rajendra Rupanvar Death : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकरणानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित झाल्या असून दोषींवरील कारवाईची मागणी होत आहे.
Dr. Rajendra Rupanva
Dr. Rajendra RupanvaSarkarnama
Published on
Updated on

Satara, 01 September : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी अवघ्या दहा महिन्यांत आत्महत्या केली आहे. फिटनेस सर्टिफिकेसाठी राजकीय दबाव आणि वरिष्ठांकडून होणारी छळवणूक यामुळे १० महिन्यांपूर्वी महिला डॉक्टराने आत्महत्या केली होती, त्यानंतर फिटनेस सर्टिफिकेटसाठी माजी आरोग्य मंत्र्यांच्या ओएसडीने धमकावले, त्यानंतर वरिष्ठांकडूनही मानसिक छळ होत असल्याने आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर (वय 27, रा. फितरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी मुंबईत सायनमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यांचा आज मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दरम्यान, डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या मृत्यूप्रकरणी फलटणच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांना आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी तातडीने निलंबित केले. दुसरीकडे मुंबईतही रुपनवर यांचे नातेवाईकांनी दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. त्यांना मार्डच्या अधिकाऱ्यांनीही पाठिंबा दिला आहे.

शस्त्र परवान्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट द्यावे, यासाठी माजी आरोग्य मंत्र्यांचे ओएसडी यांनी डॉ. राजेंद्र रुपनवर यांना धमकावले होते. त्या प्रकरणात वरिष्ठांनीही मंत्र्यांच्या ओएसडीची बाजू घेतली होती. फिटनेस सर्टिफिकेटसाठी वरिष्ठांकडून होणारा त्रास आणि दबावामुळे व्यथित होऊन फलटणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांनी यापूर्वी आत्महत्येचा इशारा दिला होता. त्यावेळी फलटण पोलिसांनी समुदेशन केल्याने दुर्घटना टळली होती.

दरम्यान, माजी आरोग्य मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाने धमकावल्याचा व वरिष्ठांकडून छळ झाल्याचा गंभीर आरोप डॉ. रूपनवर यांनी आत्महत्येच्या पत्रामध्ये केला होता. तत्पूर्वी कारवाई होत नसल्याने व्यथित होऊन त्यांनी २६ ऑगस्टला आत्महत्येचा इशारा देणारी चित्रफीत प्रसारित केली होती, तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेरीस २७ ऑगस्टला त्यांनी सायन येथे टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

Dr. Rajendra Rupanva
Satara Dcc Bank : शिवेंद्रराजे अन्‌ उदयनराजेंच्या ताकदीमुळे मातब्बरांची डोकेदुखी वाढणार : नव्या चेहऱ्यांना पुन्हा करावी लागणार प्रतीक्षा...

आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची जाग आरोग्य विभागाला आली. असंवेदनशील व्यवहार आणि प्रशासकीय त्रुटींमुळे डॉ. मदने यांच्यावर आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी निलंबनाची कारवाई केली होती.

Dr. Rajendra Rupanva
Satara Dcc Bank Election : सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा फायदा घेत मातब्बर पुन्हा शड्डू ठोकणार; सोसायटी गटात अशा असतील संभाव्य लढती...

दरम्यान, डॉ राजेंद्र रुपनवर यांचा सायनच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. फलटण उपजिल्हा रुग्णालयासमोरच डॉ. रूपनवर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला होता. आज फलटण-पंढरपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्या आंदोलनात माळशिरसचे आमदार उत्तम जानकर सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com