Praniti Shinde : राजकरण तापलं; सोलापूरात राष्ट्रवादीने लावले 'त्या' दोघांचे पोस्टर

Solapur Congress : सुशीलकुमार शिंदे-जयंत पाटलांच्या चहापानानंतरही वाद चिघळला
Solapur NCP
Solapur NCPSarkarnama
Published on
Updated on

Congress vs NCP : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या (Solapur) मागणीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाक्‌युध्द सुरू होते. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी रात्री माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांची भेट घेतली. पाटील यांनी हे शिंदे यांच्या निवासस्थानी जात पाहुणचार घेतला.

या दोन नेत्यांच्या भेटीमुळे दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेले वाक्‌युध्द शांत होण्याची शक्यता होती. मात्र आज आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुन्हा संतप्त झाले आहेत.

Solapur NCP
Tanaji Sawant : आदित्य ठाकरेंवर टीका करताना सावंतांची जीभ घसरली; म्हणाले, मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करू

राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) सोलापूरला आले होते. त्यावेळी त्यांनी शिंदे यांच्या जनवात्सल्य निवासस्थानी घेऊन जाण्यासाठी शहर राष्ट्रवादीतील एक गट उत्साही होता, तर दुसरा गट मात्र पुन्हा तेच होतंय म्हणून चिंतेत होता. दुसऱ्या गटाचा विचार न करता प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी जनवात्सल्यवर गेले. तेथे शिंदे यांचा पाहुणचार स्विकारला. या भेटीने आता लोकसभेचा विषय संपेल, अशीच शक्यता निर्माण झाली होती. त्यातच आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा वातावरण तापले आहे.

Solapur NCP
Shivsena News : 'या' मुद्यावरून शिवसेना शिंदे-फडणवीस सरकारला घेरणार; दिला थेट इशारा

आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) म्हणाल्या, "कोण रोहित पवार? त्यांची पहिली टर्म असल्याने पोरकटपणा करतात". प्रणिती शिंदे यांच्या विधानानंतर सोलापूर शहर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना ओळखत नसल्याचा उल्लेख आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर आमदार पवार व आमदार शिंदे यांच्या एकत्रित छायाचित्राचे पोस्टरच लावले आहे.

Solapur NCP
Amol Kolhe : मी स्टार प्रचारकांत आहे का? आताच कळलं; कोल्हेंच्या विधानाने पुन्हा भुवया उंचावल्या

यावेळी सोलापूर शहर राष्ट्रवादीकडून आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यावर कडक शब्दात टीका केली. भाजपमध्ये जाण्यासाठी अशी वक्तव्ये केली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर (Prashant Babar) म्हणाले, की राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुशीलकुमार शिंदे यांना राजकारणात आणले. पवार कुटुंबामुळे शिंदे कुटुंबाची ओळख निर्माण झाली. त्यामुळेच प्रणिती शिंदे या आमदार झाल्या. आज त्याच पवार कुटुंबाला त्या विसरत आहेत.

Solapur NCP
MP Rajani Patil : मोठी बातमी! खासदार रजनी पाटील यांचं निलंबन; कारण काय?

प्रणिती शिंदे स्वतः निवडून येण्यासाठी शेजारील मतदारसंघ भाजपला गहाणनखत करुन देतात. तसेच २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपला सत्तेवर आणण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी दोन्ही काँग्रेसची आघाडी तोडल्याचा आरोपही यावेळी बाबर यांनी केला.

आमदार प्रणिती शिंदे यांच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहेत. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे त्या भाजपमध्ये जाणार असल्याचा या चर्चांना दुजोरा मिळत आहे. भाजपमध्ये जायचं असेल तर त्यांनी खुशाल जावं. परंतु त्याची बंदूक राष्ट्रवादी पक्षाच्या खांद्यावर ठेवू नये, असा इशाराही बाबर यांनी यावेळी दिला.

Solapur NCP
Eknath Khadse : खडसेंचं विधान, चर्चेला उधाण; म्हणाले, "गिरीश महाजनांना..."

शहर मध्य विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये मी उमेदवारी अर्ज भरला होता. केवळ आणि केवळ वरिष्ठांच्या विनंतीवरून अर्ज मागे घेतला. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे या हॅटट्रिक करू शकल्या, अन्यथा त्यांचा पराभव अटळच होता. तीन वेळा निवडून आल्या म्हणजे मॅच्युरिटी आली असे होत नाही, असा टोला राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष जुबेर बागवान (Juber Bagwan) यांनी लगावला आहे.

सलग दोन वेळा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांना दारुण पराभव झाला. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला द्यावी अशी मागणी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली तर त्यात गैर काय? असा सवालही बागवान यांनी विचारला आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांच्यामुळे सोलापूरच्या काँग्रेस (Solapur Congress) अधोगतीला लागल्याचा आरोपही त्यांनी केला. आमदार रोहित पवार यांच्यावर झालेल्या टीकेचे परिणाम आमदार प्रणिती शिंदे यांना आगामी काळात दिसतील, असा इशाराही युवक शहराध्यक्ष बागवान यांनी यावेळी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com