Tanaji Sawant : आदित्य ठाकरेंवर टीका करताना सावंतांची जीभ घसरली; म्हणाले, मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करू

Shinde group : तानाजी सावंत हे आपल्या वक्तव्याने नेहमी चर्चेत असतात. आता देखील...
Tanaji Sawant News
Tanaji Sawant News Sarkarnama

Aditya Thackeray News : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना वरळीतून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. असे असतानाच आता आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची जीभ घसरली आहे.

''राज्यात चार मेंटल हॉस्पिटल्स आहेत. या हॉस्पिटलमध्ये जागा असेल तर मी त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यास तयार आहे'', असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे. सावंत आज (दि.१० फेब्रुवारी) सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

Tanaji Sawant News
Amol Kolhe : मी स्टार प्रचारकांत आहे का? आताच कळलं; कोल्हेंच्या विधानाने पुन्हा भुवया उंचावल्या

यावेळी सावंत म्हणाले, ''माझ्याकडे आरोग्य खातं आहे. सध्या राज्यात चारच मेंटल हॉस्पिटल आहेत. पण या ठिकाणी जेथे जागा शिल्लक असेल तेथे त्यांची नक्कीच नियुक्ती केली जाईल. ज्यांच्या मेंदूवर परिणाम झाला त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे, असा सल्ला मी मुख्यमंत्र्यांना देणार असून आपण आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करू'', असं वक्तव्य सावंत यांनी यावेळी केलं.

Tanaji Sawant News
Eknath Khadse : खडसेंचं विधान, चर्चेला उधाण; म्हणाले, "गिरीश महाजनांना..."

दरम्यान, तानाजी सावंत हे आपल्या वक्तव्याने नेहमी चर्चेत असतात. आता देखील त्यांनी आदित्य ठाकरे यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करू, असं वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com