Sangola News : सराफ व्यावसायिकांच्या मदतीला धावले बाबासाहेब देशमुख : थेट कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

Siddaramaiah News : मुख्यमंत्र्यांनी संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांना केले फोन.
Dr. Babasaheb Deshmukh, Siddaramaiah
Dr. Babasaheb Deshmukh, SiddaramaiahSarkarnama
Published on
Updated on

Dr. Babasaheb Deshmukh News : बंगळरू पोलिसांकडून व्यावसायिकांना त्रास होत असल्याकारणाने पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन दिले.

सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगण मैदानावर महानिर्धार २०२४ शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळावा काँग्रेसच्यावतीने (Congress) आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. यावेळी बाबासाहेब देशमुख यांनी सिद्धरामय्या यांना निवेदन दिले.

Dr. Babasaheb Deshmukh, Siddaramaiah
Balasaheb Thorat News : ''महाराष्ट्रातील सरकार म्हणजे, घोषणाबाजी, इव्हेंटबाजी, जाहिरातबाजी''

सांगोला (Sangola) शहरात व ग्रामीण भागात जवळपास २०० सुवर्ण व्यावसायिक आपला व्यवसाय करत आहेत. मात्र, या सर्व सुवर्ण व्यावसायिकांना बंगळरू पोलिसांकडून वारंवार त्रास होत आहे. त्यामुळे सर्व सुवर्णकार व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असल्याचे देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे. तरी या प्रकरणी शहानिशा करुन सर्व सुवर्णकार व्यावसायिकांना न्याय मिळावा, अशी विनंती देशमुख यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना केली.

तसेच 'सरकारनामा'शी बोलतना देशमुख म्हणाले, इतर राज्यातील पोलीस (Police) चौकशीसाठी येतात तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील संबंधीत अधिकाऱ्यांना कळवणे गरजेचे आहे. तसेच त्या प्रकरणाची शहानिशा करुन कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, बंगळरूचे पोलीस येवून व्यापाऱ्यांना थेट चौकशीसाठी उचलून नेतात. हा प्रकार योग्य नाही. आम्ही कायदेशीर गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत नाही. मात्र, चौकशीची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पाळळी गेली पाहिजे.

Dr. Babasaheb Deshmukh, Siddaramaiah
Siddaramaiah News : कर्नाटक प्रमाणे शिंदे-फडणवीस सरकारलाही मुळासकट बाजूला करा! सिद्धरामय्यांचा सांगलीतून हल्लाबोल

दरम्यान, डॉ. देशमुख यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी त्यांची तात्काळ दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांना फोन केले. तसेच या प्रकरणात काळजी घेण्याचेही सांगितले. यामुळे येथील सर्व सुवर्ण व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com